स्वर अंतरंगाचे - पन्नाशी पार केली
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
मी आता पन्नाशी पार केली
मनोकामना सफल झाली ॥ध्रृ॥
अहोरात्र जिला आळविती
तनामनाचा दीप लावुनी
कधी रुसली कधी हसली
कधी उपाशीच झोपवली
अशी स्फुर्तीदायक माऊली
बनली जीवनाची सावली
तिने उन्हे पार संपविली ॥१॥
कालची ती निशा संपवुनी
ज्ञानी सविता प्रकाशण्याला
दर्या डोंगर पार करुनी
दैवाची साथ मिळविण्याला
वर्तमानाला तोंड देऊनी
भविष्याशी सामोरे जाण्याला
तीच अखेर सांगती झाली ॥२॥
रांगडा रथ मार्गी लागता
खाचखळगे पार करता
चिखल गोटे बाजू सारता
सोडिले ना धैर्य जाता जाता
पाहिले कुणी नाचता गाता
तर कोणी मिष्कील हसता
प्रतीभा शेवटी साथी झाली ॥३॥
जी राजकारणी समाजकारणी
सृष्टीसौंदर्याची रुप राणी
शीलवंताच्या अंजलीतुनी
येते शब्दाची सुधा घेऊनी
सत्य निती तत्त्वाला रक्षुनी
कविमना देते संजीवनी
दिशाहिना वाटाडया बनली ॥४॥
पाषाणातुनी पार जाऊनी
आकाश पकडती मुठीत
भावसुमने फुलवी मनी
सुगंध देती दाही दिशात
चिरंतन आश्रय लाभला
हृदयस्थ बनवी भक्ताला
जिवस्य कंठस्य पदावली ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP