स्वर अंतरंगाचे - मृगजळ
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
नात गोत हे असे, काही औट घटकेचे
नव्हे कोणकुणाचे, फक्त दिल्या घेतल्याचे
दुर्योधनाची कारस्थाने कळणार कशी
मने गेली रसातळाला जीवन उदाशी ॥१॥
फुले फुले जाणुनी माझा ताटव्यात हात
हाता ना लागे फुले कळ्याही नसतो त्यात
किडे मुंग्या किटके हाची बहर जयात
असेच घडत जाते काहीच्या जीवनात ॥२॥
तहानेने व्याकुळल्याने शोधत सुटला
जीवन समजुती व्यर्थाची धावु लागला
पळुनी पळुनी थकला त्रासला मनाला
आशेचा काळ निराशतच जाऊ लागला ॥३॥
गुदमरला जीव झालो व्याकुळ म्हणून
प्राणवायुसाठी मी धावत आहे अजून
वादळातील प्राणवायू किती मिळणार
जरी झालो दिशाभूल तरी मार्ग शोधणार ॥४॥
ज्योती च्योती समजूनी धावे अंधरातुन
वाटे अंधारातच संपेल का हे जीवत
असे किनी पळावे या भव तिमिरातुन
तरीही जीवन जगण्या प्रभावित मन ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP