स्वर अंतरंगाचे - विनोबाजी
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
भूदान गीता स्मरता, विनोबाजी वसे चित्ता ॥ध्रृ॥
रवि एक संत घेऊनी आला
भारत भूमी उजळूनी गेला
आनंदाचा एक झोत दिसला
अवतरली भूदानाची माता ॥१॥
ही भूमी असे भव निर्मात्याची
या जीवजंतुच्या जीवाभावाची
भूदान करा ही इच्छा प्रभूची
हा विनोबाचा संदेश सर्वथा ॥२॥
पदयात्रा काढुनीया देशात
पाडी झोत किसान हृदयात
संपादुनी भूमी वाटे दीनात
वंदन करुया महान संता ॥३॥
अपात्रास दान हेची नादानी
हेची माणुसकीची मानहानी
दान करावे पात्राला पाहुनी
विनोबाजीना आठवू या आता ॥४॥
श्रीकृष्णाच्या भाष्यावर चिंतन
विनोबाचे गीता स्पष्टीकरण
त्यानी शिकविले ब्रह्मनिर्वाण
गीताई ही उपकारक गाथा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP