स्वर अंतरंगाचे - काल आज
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
काल रिता होते
आज पाणी आहे
काल मोकाट होता
आज बंदिस्त आहे ॥१॥
काल लंगडा होता
आज चालत आहे
काल धुडकी होती
आज पळत आहे ॥२॥
काल दु:खात होता
आज सुखात आहे
काल उधळ होती
आज याचना आहे ॥३॥
काल घामात होता
आज चैनीत आहे
काल धुंदीत होता
आज नाशात आहे ॥४॥
काल दीनात होता
आज धनात आहे
काल घरात होता
आज पार्टीत आहे ॥५॥
काल मजेत होता
आज गर्वात आहे
काल अन्यायी होता
आज न्यायी आहे ॥६॥
काल भूकेला होता
आज पोटभर आहे
काल नासत होते
आज दुर्मिळ आहे ॥७॥
काल एकटाच होता
आज माणसात आहे
काल प्रेमळ होता
आज कठोर आहे ॥८॥
काल रडत होता
आज हसत आहे
काल नाचत होता
आज बसत आहे ॥९॥
काल कळी होती
आज फुलली आहे
काल फुल होते
आज देठ आहे ॥१०॥
काल मूल होते
आज तारुण्य आहे
काल कच्चे होते
आज पिकले आहे ॥११॥
काल कृतघ्न होता
आज कृतज्ञ आहे
काल देणारा होता
आज घेणारा आहे ॥१२॥
काल अधर्मात होता
आज धर्मात आहे
काल अज्ञानी होता
आज ज्ञानी आहे ॥१३॥
काल माणुसकी होती
आज अमानुष आहे
काल दुर्जन होता
आज सज्जन आहे ॥१४॥
जे काल होते
ते आज नाही
जे काल नव्हते
ते आज आहे ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP