स्वर अंतरंगाचे - आम्ही
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
आमच्या नमस्काराची बहुजन वाट पहाती
परंतू त्याना ठावे नाही, किती आहे आम्हा हाती ॥१॥
पिके दिसती शेतात देऊनी पाणी घाली खत
आमचे खत पाणी, देते अमर पीक जगात ॥२॥
रवि देई उष्णता प्रकाश, चंद्र शुभ्र चांदणें
आम्ही ज्योती फुलऊनी झुलवितो कोणी न जाणें ॥३॥
दु:खे विघ्ने येती घरा, जरी ती दैवाच्या स्वाधीन
आम्ही अश्रू पुसीतो, हसुनी हसवितो जीवन ॥४॥
रवि जाता अस्ता अंधारा ठायी उजेड होईल
आम्ही मावळता तिमीरातही प्रकाश राहील ॥५॥
चालणारा पळू लागला पळणारा नभी गेला
बुध्दीच्या विकासानेच तुम्ही पुढे पुढे चालला ॥६॥
मरुनी उरेल, पुरुनी उगवेल, तेच ज्ञान
येईल जाईल, हसेल रुसेल, तोची सन्मान ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP