मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड|

स्वर अंतरंगाचे - जीवन

काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड


सुखी तन । दु:खी मन
हे असे चाले । जीवन गाण ॥१॥

चक्षू पाणीदार । दृष्टी वक्र
हे कसे चक्षू । नजरे बाहरे ॥२॥

कर मजबूत । परी खाली हात
हे कसे कर । आघाडी नादानीत ॥३॥

कर्ण मधुर । हात ठेवीवर
हे कसे कर्ण । जो ऐके बेसूर ॥४॥

शीर नटवले । विचार बाटले
हे कसे शीर । रिक्त बोहले ॥५॥

मुख छान । हीन निरुपण
हे कसें अनन । व्यर्थची जाण ॥६॥

पद तत्पर । पण पडे वक्र
हे कसे पद । मरणा भार ॥७॥

मजबूत तन । पण कृतीहीन
हे कसे तन । बरे जरापण ॥८॥

जीवन श्रीमंतीत । परी हा मैफलीत
हे कसे धनवालें । जगती घाणीत ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP