स्वर अंतरंगाचे - शहाजीराव पाटील
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
जे शेतकरी कुटुंब जिवलग भले
अशा कुटुंबात आपले नेते जन्मले
मनमिळावू प्रेमळ अशी गोड वाणी ॥१॥
वकिलीचे शिक्षण, वैचारिक धोरण
नेता संयमशील आणि चारित्र्यवान
स्मरणात राही त्याची आदर्श रहाणी ॥२॥
मतदाराला जागणारे आदर्श नेते
होते काँग्रेसचे एकनिष्ट कार्यकर्ते
विधायक कार्याचे होते राजकारणी ॥३॥
आम्हा दीनाच्या जिवाभावाचे आमदार
राज्यमंत्री अध्यक्षाचा होता पदभार
आम्हीसर्व त्यांचे शतश: आहोत ऋणी ॥४॥
जातियवाद ना धर्म होते लोकनेते
मानीत नसे गरिब श्रीमंत ना नाते
समाजवादी जनसेवकाची कहाणी ॥५॥
केला त्यानी जिल्हाभर विविध विकास
त्यात असे `गरड' काँलेजचा प्रकाश
किती गाऊ गुणवाणाची प्रेमळ गाणी ॥६॥
शेतकरी, मजूर, नोकर, पत्रकार
व्यापारी, दुकानदार, वकिल डाँक्टर
आठऊ या शहाजीरावाच्या आठवणी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP