स्वर अंतरंगाचे - अनुक्रमणिका
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
गणराया तुला सांष्टांग नमस्कार ॥धृ०॥
तुझ्या स्वागता माझे गीत
मेघा आडून रवि झोत
वायु लहरीचा सुरात
सुधाची होई बरसात
हर्ष उल्हासे नाचू लागे चराचर ॥१॥
आपल्या पदस्पर्शानी
पुणीत झाली ही धरणी
आनंदली कुलस्वामीनी
स्वागता सजली भक्तीनी
प्रेमे करती तुझा आदर सत्कार ॥२॥
मनोविकार पळतील
पापे जळुनिया जातील
संकटे नाहीशी होतील
अधर्म लोप पावतील
अंगीकारती संयम नि सदाचार ॥३॥
मंदिरे सजली फुलली
शाळा काँलेज बहरली
घरे नि दारे उजळली
आबालवृध्द सुखावली
चिंतन तुझे एकताल एकसुर ॥४॥
फळे सुमने बहरती
पिके वृक्षवल्ली डोलती
प्राणी पक्षी नाचुनी गाती
दाही दिशा प्रफुल्ल होती
सर्व प्राणीजात करावी सुखकर ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP