स्वर अंतरंगाचे - दिपवाळी
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
आली दिपवाळी ॥ध्रृ॥
पाऊस पाणी छान झाले
सृष्टी सौंदर्य आनंदले
शेते मळे फुलून गेले
चारा पाणी मिळू लागले
पसरे आनंदी झावळी ॥१॥
जीवनाच्या काळोख राती
घालविती दिव्याच्या ज्योती
जाळूनी टाकू दैन्यस्थिती
उजळूया नरवस कांती
देऊ भेदभावा तिलांजली ॥२॥
आनंदी फुलबाजा उडती
काही त्या झोतात प्रकाशती
कुठे तेलाच्या कुठे तुपाच्या
जळत रहाती पणती
कोणा हाती याचनेची झोळी ॥३॥
फटाक्याच्या आवाजाने
काही हृदया येते भरती
काही आत्म्याचे व्याकुळसूर
हृदयातच विरुनी जाती
अशीही आवाजाची दिवाळी ॥४॥
अंधाराशी तोंड देऊनी
चांदण्यात रमून जाण्याला
भवितव्याशी झुंज देऊनी
दिवाळीचा सूर्य पहाण्याला
तू जागा रहावा या वेळी ॥५॥
दीनदलिता हाती धरुनी
श्रमजीवीची ज्योत पेटवू
मंदज्योती प्रकाशीत करु
आज सर्वा नटवू थाटवू
या एकत्र खाऊ दूध पोळी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP