स्वर अंतरंगाचे - त्यांना रक्षा बंधन
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
जो मरुनी जगेल जीवन
त्याना रक्षा बंधन ॥धृ०॥
या दुनियेच्या बाजारात
बहु दिसती गुन्हेगार
काही फसविती झोपेत
करुनी कारस्थानी वार
जे रहाती या पासून दूर
ते समजा सज्जन ॥१॥
जो जुगारात अडकुनी
मटक्याने वेडा बनला
जो नशेचा गुलाम होऊनी
सर्वनाश करु लागला
जे लाथाडती अशाला
ते माना गुनवान ॥२॥
अविकसित अवगुणी जे
जे षडरिपुचे गुलाम
कपटीं विदुषी करणी
जयाची भावना हराम
ज्याचा अशाना रामराम
तेची चारित्र्यवान ॥३॥
जे लाचखोर भ्रष्टाचारी
जया ठायी चमचेगिरी
आपपर भाव करुनी
असत्य बसे सत्यावरी
जो या अवगुणा धि:कारी
तोच देशाची शान ॥४॥
बंधू मानू नितीवानाला
आदर्श नि वंद्य कर्माला
मानवतेच्या पुजार्याला
दयाघनाच्या पुतळ्याला
विनंती माझी भगिनीला
असेच बंधू जाण ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP