स्वर अंतरंगाचे - बसस्टँड
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
आवाक झाला दृश्य पाहुनी
ज्यानी आताच पाहिले
किती काळ लोटला ना ठावे
हे असे चालत आले ॥१॥
निरोप देती निरोप घेती
चालू लागे काही वेळ
काय वेडी रीत असे जगी
नाही कळे दैवी खेळ ॥२॥
हौसेने बसुनी मोजे उंची
करितसे खालीवरी
कोणाकरी वांग्याचा भोपळा
हे मोजण्या बोटावरी ॥३॥
काही ऐतखाऊ खोडकर
करिती खोडया बसुनी
काही युवतीची छेड काढी
मांजरासारखे कुणी ॥४॥
कोणाचे भारावलेले मन
निरोप देताना दिसे
कोणाचे पाणावलेले डोळे
निरोप घेताना दिसे ॥५॥
नववधू कन्येला निरोप
आई बाप भारावती
ओक्साबोक्सी सर्वच रडती
ही भारतीय संस्कृती ॥६॥
हृदय हेलावे ममतेचे
बस यावी उशीरान
थोडेसे करीन हितगुज
बोले ते मातेचे मन ॥७॥
येई धावत नेणारी गाडी
कोणाला ती वाटे काळ
गाडीचा चालक यम दिसे
कोणा भले कोणा छळ ॥८॥
असे चालणार दुजा बोले
समाजाची अशी रीत
तेव्हा रडला आता विसरे
हे दृश्य होतो बघत ॥९॥
हे सम्मेलन नव्या जुन्याचे
हे सर्वगुण दर्शन
काही वेळाने होई समाप्ती
रंक असो की महान ॥१०॥
धावाधावी पळापळी चाले
कोणी येताना हसते
अशा निराशेचे हे मीलन
कोणी जाताना दिसते ॥११॥
ह्या औटघटकेच्या ठिकाणी
सर्व बंधूत्व दिसते
हसुनी एकमेका भेटती
ही एकात्मता नांदते ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP