स्वर अंतरंगाचे - स्वागत
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
महाराष्ट्राचे राजे । स्वागत घ्यावे माझे ॥ध्रृ॥
घननिळा बरसुनी सृष्टी व्हावी तृप्त
तिमीर जाऊनी जशी व्हावी सुप्रभात
आपल्या आगमनाने तसे झाले माझे ॥१॥
प्रेमळ शीतल नेतृत्व आपुले
आमुच्या हृदयात खोलवर रुजले
आपण महाराष्ट्राचे मुकुटमणी साजे ॥२॥
जयाची दीन बंधू प्रति प्रीति
जशी अंधारातील समय ज्योती
कृतज्ञ झाले आपणामुळे सुखले जे ॥३॥
दीनदलिताचा मेळा सदैवभोवती
सर्वधर्मीयाचा हात आपणा हाती
धन्य आपण विधायक कार्याचे राजे ॥४॥
तत्त्व प्रणाली एकनिष्ठेला वाहिली
पक्षाच्या चादरीत एकात्मता साधली
आपण या निधर्मी देशाचे छत्रपती राजे ॥५॥
सह्याद्री हा हृदय हिमालयाचे
तसे महाराष्ट्र आहे भारताचे
आपण हो पक्ष बांधवाचे धर्मराजे ॥६॥
कर्तव्य तत्पर सेवेचे व्रत धरुनी
हाती देऊनी हात जाण्यास सांगावे
मगच पक्षाचे उडतील फुलबाजे ॥७॥
ग्रीष्म संपेल राज्याचा, शरद येता
वणवा विझेल, ऐक्याची वर्षा होता
सुपर फास्ट भर यशाची घंटा वाजे ॥८॥
झाले पुरे झाले कशाला पुढे आणता
जाळुनी पुरुनी टाका मतभेद आता
लोकाचे हित साधा नांदेल रामराज्य ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP