स्वर अंतरंगाचे - वाट
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
वाट ही जीवजंतुच्या जिवाची सांगती आहे
तसे ध्येय सिध्दीच्या शिखराची प्रीती आहे
तर कधी अर्ध्यावर विझणारी ज्योती आहे ॥१॥
ही कुणा पालखीतून मिरवीत नेते
कुणा स्वत: ओझेहोईपर्यंत घेऊनी फिरते
तर कुणाची बेडया घालुन धिंड काढते ॥२॥
काहीना मोटारगाडयातून सुखाने फिरविते
तसे आकाशातून पक्षाप्रमाणें उडविते
तर कुणा अभाग्याला भीक मागताना पहाते ॥३॥
काहीच्या नशिबाची जननी होऊनी
याचकासाठी क्षमाशिलता अंगिकारते
तर मी पणाला अर्ध्यावर सोडुनी जाते ॥४॥
ही पंचपक्वानाच्या पंक्तीला नेऊन बसविते
तसे समारंभात नेऊन आदरातिथ्य करविते
तर कधी हवेलीतून झोपडीत विसावते ॥५॥
ती कधी वळणा वळणाने मंदिरात जाते
तसे अज्ञानी मैदानातून ज्ञान पिठावर येते
तर कधी मंदिरातून काटयाकुटयात शिरते ॥६॥
प्रेममय फळाफुलातुनी आनंद लुटुनी
रुपवतीच्या पावलाने भिजत जाते
कुणा जळत ढेवते तर कुणा जाळत नेते ॥७॥
दोन हृदयाचे मीलन करुनी जाते
तसे मायचं कबुतर बनुनी निरोप देते
कधी दोन जिवात भिंत बनुनी उभा रहाते ॥८॥
कर्तव्यपरायणता, समता, बंधुता, धर्म याना
बहुमान देऊनी मातेची ममता अर्पण करते
तर भ्रष्ट आत्याचारी नितीचे रक्त सांडीतजाते ॥९॥
ही सातासमुद्र सुखाने पार करते
तसे ओढे नद्या दरी ओलांडुनी जाते
कुणा जलसमाधी देते कुणा नभातून फेकते ॥१०॥
ही ग्रीष्माच्या उन्हातुन नेते सावलीला
तसे ओसाड भग्न माळातुनी जला तिराला
तर कधी जंगली श्वापदाच्या ठिकाणाला ॥११॥
आली अश्मयुगातून अशी घेत सोडत
येथुनही अशीच जात आहे सोडत घेत
तर काहीना चालली शिक्षा ठोठावत ॥१२॥
रामकृष्णाच्या सत्याचे गाठोडे घेऊन जात आहे
तसे सीता द्रौपदीची गुणी सुगंध सोडीत आहे
तर रावण दुर्योधनाच्या दुर्गूणाला तुडवीत आहे ॥१३॥
शिवबाची न्यायनिती, देशभक्ताची आहुती सांगत आली
स्वातंत्र्याच्या निर्मळ चादरीतील लोकशाहीला हाती धरुनी
कुणाला जागीच ठेऊन तर कुणा सोबत घेऊन चालली ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP