स्वर अंतरंगाचे - जपून जा
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
जपून जा गडया जपून जरा ॥धृ०॥
तुझ्या जीवनाच्या मार्गावरी
कठीन समस्या चाल करी
तोल जाई पहा, धीर धरी
म्हणून मी सांगे विचार करा ॥१॥
कुठे जाणार ठावे का तुला
विचाराने चाल त्या वाटेला
बिकट वाट ध्येय साध्याला
म्हणून सावधतेचा इशारा ॥२॥
तुझ्या मार्गाने जात असता
हे टपले रोखण्याला रस्ता
पाडण्यास तुला जाता जाता
जा चोहबाजूला पाहून जरा ॥३॥
करु नको कुणाचीही निंदा
ना कर कर्तव्यच्युत धंदा
सतकर्माचा कर तू वादा
गुणवान रहा फिरेल वारा ॥४॥
कोण नसे का कुणाचे
सगे सोयरे सर्व सुखाचे
आतडेच शेवटी प्रसंगाचे
अजुनी आहे ते भेटायचे
अंतरंगाचे परिक्षण करा ॥५॥
मार्गी जंगले सुंदर बाग
फसवी ना फसे नीट वाग
क्षणिक सुखात नको भाग
होऊ नको तू बळीचा बकरा ॥६॥
ध्येय गाठण्या या मार्गातूनी
दूर आहे शिखर अजूनी
कष्ट फार पडती जीवनी
कर्तृत्वावर ठेव भार सारा ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP