स्वर अंतरंगाचे - खेळ
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
चालला हा खेळ काही घटकाचा ॥ध्रृ॥
निरभ्र रात्र काळोख्याची
होती ओसाड मानवाची
चाले किर्र रात्र किडयाची
अंधारातच चाले खेळ काहीचा ॥१॥
रात रांगडी उषाकडे
उषाचा ओढा भानुकडे
सर्व जातो अनंताकडे
संपवा अंध:कार या जीवनाचा ॥२॥
होताच सकाळ प्रहर
कोणा करती नमस्कार
कोणी टपे घबाडावर
सज्जन करतसे धावा देवाचा ॥३॥
मांगल्यात जो अमंगला
लोळला बसला उठला
कितीतरी असा छळला
चाले असा अवतार जीवनाचा ॥४॥
तू तारुण्याच्या बहरात
बाल्यावस्थेला दिली लाथ
सुटला तनू लहरीत
असा काळ नाही जास्त टिकायचा ॥५॥
दाही दिशा होती उन्मत्त
जशी भरती सागरात
तसे कर्म नको कार्यात
सन्मार्गाने जा हा मार्ग खळग्याचा ॥६॥
जो मनोनिग्रह राखील
संयमाने धर्म शिकील
संकटातूनी निभावेल
तोची आधार देशाचा, बांधवाचा ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP