आरती चंद्राची
संत बहेणाबाईचे अभंग
६१९.
प्रकाश निर्मले कोमल कमलोद्भव । देखुनि रमला तेथे भ्रमराचा भाव । ऐसा प्रेमळ सीतळ तारापति देव । अनुभव - सिद्धा देतो मुक्तीचा ठाव ॥१॥
जयदेव जयदेव जय रजनीकांता । दर्शनमात्रे निवविसि भवतापव्यथा ॥धृ०॥
प्रतिमासा - अंती द्वितिया येती जन्माची । राका येता प्रतिमा पूर्ण बिंबाची । चतुर्थीची पूजा भाविक भक्ताची । गोपाळाते छाया करिसी कृपेची ॥२॥
नव रत्नाहूनी रत्न शास्त्राचा विवेक । उपसे तुजई तुळिता तुझा तूचि एक । शिवमौळीचे भूषण लुब्ध चकोर । भक्ती भजता सिद्ध साधी पद पहिला पद्क ( अपूर्ण ) ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 06, 2017
TOP