श्लोक - ५१ ते ५४
संत बहेणाबाईचे अभंग
५१.
गणेश पूजोनिया विधीने । प्रवर्तला सृष्टिकर्मा विधाने ॥ यालागि मी वंदि श्रीमोरयासी । छेदीन मी मीपण संशयासी ॥१॥
वंदूनिया जाण सरस्वतीला । देईल ते सिद्ध - महामतीला ॥ तेणे गुणे वर्णिन देवराया । बुद्धीसि जो बोधक, दे वरा या ॥२॥
यानंतरे सद्गुरुराज वंदू । जो हा स्वबोध - निजज्ञान सिंधू ॥ पूजीन मी मानसपूजनाते । त्रैलोक्याची अर्थ करू मनाते ॥३॥
यानंतरे संतमहंतसाधू । सजूनिया वर्ताति जे विषादू ॥ तया नमो अद्वय निश्चयाने । ज्याच्या वरे जोडति मोक्षयाने ॥४॥
आता नमो जाण कुळांबिकेला । जीच्या वरे सन्मतिलाभु केला ॥ अखंड हे हद्गत होय माते । नमोनिया श्रीकुलअंबिकेते ॥५॥
आता नमो सज्जन श्रोतयांसी । असा तुम्ही सावध मी जयासी ॥ पावेन मी तै तुम्हास माने । यालागि मी प्रार्थितसे क्रमाने ॥६॥
डोलेल जै मस्तक श्रोतयाचा । पावेन तै भाव महाजनाचा ॥ बहेणि म्हणे प्रार्थित याचिलागी । अखंडता घ्याउनिया प्रसंगी ॥७॥
५२.
नमो लक्षलक्ष्यातिता वेदवेद्या । नमो ध्येयध्यानातिता नित्यनित्या ॥ नमो सर्वसाक्षी नमो सर्वकुक्षी । नमो बहेणि - गंगाधरा मोक्षपक्षी ॥८॥
५३.
नमो भेदभेदातिते वेदगर्भे । नमो अंबिके अंबिके वो स्वयंभे ॥ नमो व्यंजने शांतिरूपे अमूपे । नमो बहेणि - गंगाधरा शांतिरूपे ॥९॥
५४.
बहेणीने अवलंबुनी श्रीरामस्मरण मानसी धरिले । गंगाधर - वंशीच्या येकोत्तरशत कुळासि उद्धरिले
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2017
TOP