मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
आरती श्रीभगवद्गीतेची

आरती श्रीभगवद्गीतेची

संत बहेणाबाईचे अभंग

६१६.
गीता गीता ऐसे वदता पै वाणी । विश्वंभर निजरूप होईल पै प्राणी । संग्रह करिता गीता, “ जन्मांतर खाणी । नाही ” ऐसे वदला व्यासहि निर्वाणी ॥१॥
जयदेवी जयदेवी जय भगवद्गीते । ऐसे वद तू रसने भगवद्रुपजीविते । ऐसे वद तू रसने भगवद्रुपजीविते ॥धृ०॥
श्रवणे गीता अथवा पाठांतर गीता । झाली तरि साची हरि विक्रित निजभक्ता । विशेष अर्थान्वय जरि सांगे मुखे वक्ता । तोचि हरीरूप जाणा देहचारी असता ॥२॥
जन्मांतरी अतिदोषी गीता म्हणता ते तरले अगणित नेणो झाले हरिरूपी ते । गीता तारक कलियुगी जाणती अनुभवी ते । गीता - पाठक होती हरीरूप जाणा ते ॥३॥
’गंगा म्हणता गीता, गंगा सरी न पावे । अवले पोहता बुडती म्हणवुनी सरी न सामावे । गीता गीता म्हणत मूर्खहि तरती स्वभावे । म्हणवुनि गीता तारक केली हे देवे ॥४॥
उदार गंभीर गीता सकला फलदाती । माता उपमा न पवे उदार अतिकीर्ति ॥५॥
पठणे श्रवणे सकला एकचि फलप्राप्ती । बहिणी अनुदिन हृदयी ध्याते निजभक्ती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP