मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
आरती श्रीरामाची ( शेजारती )

आरती श्रीरामाची ( शेजारती )

संत बहेणाबाईचे अभंग

६१७.
हनुमंत जांबुवंत पुढे उभे राहाती । जोडुनि पाणी दोन्ही रामस्तुति करिती । श्रीराम शेजी पहुडले सीता मंचक सावरी । उभी जनकबाळा आरती घेऊनी करी ॥धृ०॥
कर्पूर उजळती रत्नदीप शोभती । आणिक दीपावली सुगंधी लाविती । सुगंध बहु फार दशांग लाविला । भरत शत्रुघ्न पुढे लक्ष्मण उभा राहिला ॥२॥
उधरण रंगी आणि द्राक्षफले बहुता प्रकारे । रामापुढे ठेविताती सकळिक पक्कान्ने सारे ॥३॥
सीतादेवी दे तांबूल त्रयोदश गुणी । उपचार किती वानू शिणली व्यासवाणी । राघवे निद्रा केली आज्ञा सकलांसी दिधली । सीतादेवी चरणी स्थिरली । पाहुनी बहिणी आनंदली ॥४॥


References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP