मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग| संशोधनातून नवीन मिळालेले अप्रकाशित अभंग संत बहेणाबाईचे अभंग १ ते १० ११ ते २० २१ ते २९ ३० ते ४० ४१ ते ५० ५१ ते ५४ ५५ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १४२ १४७ ते १६० १६१ ते १७० १७१ ते १८० १८१ ते १९४ १९६ ते २०० २०१ ते २१० २११ ते २२० २२१ ते २३० २३१ ते २४० २४१ ते २५० २५१ ते २६० २६१ ते २७० २७१ ते २८० २८१ ते २९० २९१ ते ३०१ ३०२ रे ३१० ३११ रे ३१८ ३१९ ते ३२६ ३२७ ते ३३७ ३२८ ते ३४४ ३४५ ते ३४९ ओव्या पद ३५३ ते ३६२ ३६३ ते ३६४ ३६५ ते ३७९ ३८० ते ३९० ३९१ ते ४०० ४०१ ते ४०७ ४०८ ते ४२० ४२१ ते ४२५ ४२६ ४२७ ४२८ ते ४२९ ४३० ते ४३३ ४३४ ते ४४५ ४४६ ते ४५५ ४५६ ते ४६९ ४७० ते ४८० ४८१ ते ४९० ४९१ ते ५०० ५०१ ते ५१० ५११ ते ५२० ५२१ ते ५३० ५३१ ते ५४४ आरती रामाची आत्मनिवेदन ५४७ ते ५६० ५६१ ते ५६९ संतवर्णनपर ५७१ ते ५७४ ५७५ ते ५८६ पंचतत्त्वांचा पाळणा ( जोगी ) फुगडी पिंगा झिंपा हमामा हुंबरी ५९६ ते ६०७ ६०८ ते ६१५ आरती श्रीभगवद्गीतेची आरती श्रीरामाची ( शेजारती ) ६१८ ते ६५० आरती चंद्राची आरती सद्गुरूची ६५१ ते ६९१ संतमहात्म्यपर संशोधनातून नवीन मिळालेले अप्रकाशित अभंग संशोधनातून नवीन मिळालेले अप्रकाशित अभंग संत बहेणाबाईचे अभंग Tags : abhang marathibahenabaiअभंगबहेनाबाईमराठी संशोधनातून नवीन मिळालेले अप्रकाशित अभंग Translation - भाषांतर अ ) प्रा. म. रा. जोशी यांचे खाजगी संग्रहातून मिळालेले ६९४. अवचित लोखंड हाणी दुश्चितपणे । तया ऐसे आन पाप नाही ॥१॥ऐसे ते जाणावे मतीचे चांडाळ । प्रचीतीचे बळ न दिसे तया ॥२॥निद्रितावधी अग्नी लावी घरा । पातेजोनि बरा विष घाली ॥३॥बहिणी म्हणे ऐसे विश्वासघातकी । वास त्या नरकीं सर्वकाळ ॥४॥६९५. संतासी सुखदुःख सारिखेचि भासे । तो संत निःशेषे जाणिजेसु ॥१॥येराची अवघी जाण चित्रकथा । जोवरी नाही चित्ता अनुताप ॥२॥वादनिंदाभेद जो राहे गिळोनी । तो एक संतजन मिरवे देखा ॥३॥कामक्रोधहिंसा नये ज्याच्या चित्ता । तो संत तत्त्वता एक होय ॥४॥आशा मनसा तृष्णा कल्पना विघरे । तो संत साचारे जाणा तुम्ही ॥५॥बहिणी म्हणे जीवे जिता ना मेलासा । संतत्वाची दशा जाणिजे ते ॥६॥६९६. नलगे संपादनी द्यावा परिहार । अंतरी अंतर जाणवते ॥१॥घराची ते वोज दाखवी आंगण । कळे ते आपण क्रिया तैसी ॥२॥न लगे ते झाकावे न लगे ते लोपावे । कळते अवघे अंतरसाक्षी ॥३॥बहिणी म्हणे सीत पहावे चेपोनी । अवघे घोटोनी काय काज ॥४॥६९७. घनाचे घायी निवडे जो हिरा । तेव्हा मोल खरा पावेल बापा ॥१॥येर ते फलकते जाती फुटोनिया । करणीचे वाया फुकट जाई ॥२॥मोहरा तोचि एक न जळे सूतसंगे । दुखता पोट वेगे बरे करी ॥३॥बहिणी म्हणे परिस कळे तोचि जना । लोहाचे कांचना करी जेव्हा ॥४॥६९८. तोचि एक शूर जाणे घावडाव । रक्षोनिया जीव ( न ) फिरे मागे ॥१॥तोचि एक बळी विवेकबुद्धीचा । जाणे अनुभवाचा अंगसंग ॥२॥पाउलापाउली सारी भूमी मागे । न करी स्वामीसंगे वंचकता ॥३॥राखोनी आपणासी तारी दुजियासी । बहिणी म्हणे त्यासी मोल नाही ॥४॥ब ) समर्थ वाग्देवतामंदिर, धुळे - बाडातून मिळालेले ६९९. रांड तेचि खरी मुखी नाही हरी । ते जाणावी निर्धारी जन्मरांड ॥१॥जया पुरूषाचिये मुखी नाही हरी । जाणावा ता खर जन्मा आला ॥२॥टिळे टोपी माळा नराचा आकार । जाळावा विचार ज्ञानेविण ॥३॥बहिणी म्हणे जया नाही आत्मज्ञान । जाणावे ते श्वान जन्मा आले ॥४॥७००. संकल्पापासोनी हिरोनी घेतले । मन हारपले विकारेसी ॥१॥सुख ते सांगता सुखदुःख पळे । कोनाचिया बळे बोल बोलो ॥२॥इंद्रियांची श्रांति पावली हा बोल । बोलता नवल ऐसे झाले ॥३॥बहिणी म्हणे भेटी अक्षराची चित्ता । होताचि पूर्णता हारपली ॥४॥७०१. तूप असे क्षीराआत । साकर उसाच्या रसात ॥१॥परी पाहिजे हो ज्ञन । वस्तुप्राप्तीचे कारण ॥२॥सोनयाचे होती नग । पट सूताचे अनेक ॥३॥अहो काष्टामाजी अग्नी । तिळामाजी तेल जाण ॥४॥बहिणी म्हणे देही देव । ज्ञानेविण सर्व वाव ॥५॥७०२. येकादसी व्रत व्रतामाजी श्रेष्ठ । गाईत्री वरिष्ठ जपामाजी ॥१॥येणेची जीवीसी होईल ते मुक्ती । ठेवावी विरक्ति मनामाजी ॥२॥सद्गुरूची सेवा आणि अन्नदान । भूतदया पूर्ण माने जया ॥३॥बहिणी म्हणे नाम जपावे सर्वदा । येणे परमपदा पावसील ॥४॥क ) महाराजा सरफोजी - सरस्वती महाल, तंजोर ग्रंथालयातून मिळालेला. ७०३. शुभ्र सिंधु वरती वरेला लडीयावरी दाविती शोभा ॥ कर्ण विराजित शोभत सुंदर अद्भुत तेज उणे रविबिंबा ॥ दुष्ट प्रसीध नसे मन स्वस्ति कथा करी व्यस्त पाहात रभा ॥ सांगत सर्व आपूर्व जनि हारि कथा परी व्यर्थ शुभा ॥ टाळ मृदंगाविणे धृपदे मग मेळविती धन मानप्रतिष्ठा ॥ हींडती देशविदेश विशेषत नाम विकुनि ते दाविती निष्ठा ॥ मंत्रउपासन सांगती साधन नाटक ते ठक मान्ये कनिष्ठा ॥ बहिणी म्हणे असे संत नव्हेति रे सांगतसे निजसज्जन ईष्टा ॥( शिऊर हस्तलिखित वा प्रकाशित गाथ्यांमध्ये नसलेली. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे इतिवृत्तातून मिळालेली. )बहिणाबाईची संतनामावळी ७०४. संतनारायण प्रतक्ष जाणा : साधकासि जीवदान : जयाचे स्मरणें जाति सर्व दोश वैकुंठ तें भुवण : परंपरा हेचि कुळदेव आम्हा बोलति वेद आपण : शुक वामदेव व्यास वसीष्ट निरंतर करूं त्यांचे स्मरण रे या ॥१॥संत आम्हा देव संत आम्हा देव संतचरण भाव जडला : सदा नाम त्याचे उच्चारू वाचें हाचि करूं जप भला : नित्य स्नानसंध्या करू देवार्चन परम धर्म भक्त (T) ला : गाउं नाचो नित्य करूं हरीकथा आम्हासि तो सुखसोहळारे या ॥धृ०॥सिद्ध रूषी मुनि शैव वैष्णव योगी मानुभाव जाणा : गण गंधर्व क्षये किन्नर शडदर्शणाच्या खुणा : जे जे भक्त कोन्ही होऊनि गेले न करवे त्याचि गणणा : ॥ उच्चारिता वाचे वाढला ग्रंथ सकळा माझें लोटांगणरे या ॥२॥व्यास ऋषि आणि वैष्णव भक्त अट्यासी सहस्र मुनि : सुरनर पंन्नग भक्त अनेग मिळाले जे चक्रपाणी ॥ तया संतासंता नमन माझे चौयुगामाजी जे ज्ञानि ॥ भावभक्ति मनें वाचा काया हे ठेवियेली त्याचे चरणिरे या ॥३॥मुद्गल विष्णुदास आच्युताश्रम पाठकनामा रोहिदास : मत्छद्र गोरेख सालया रसाळ चौभाशा सिद्धमुद्धेश : मृत्युंजय आणि रेणुकानंदन विठावर बळसीद्ध नागेश : मुकुंदराज आणि श्रीधर आवधूत सदा करूं नामी घोशरे या ॥४॥जनजसवंत एका जनार्दन भानुदास मिराबाई ॥ जयदेव जाल्हण परमानंद जोगा नित्यानंदभक्त पाहि । कान्हया हरिदास भोजलिंग पोशा तुळसीदास नरसाबाई । कुर्मदास अंत देव भक्तजन आठवति माझा हृदई रे या ॥५॥निवृत्ति सोपान ज्ञानदेव जाण मुक्ताई वटेश्वर : काकोमडका बाळाजनका घोंका । चोखामेळा खेचर : परसा भागवत जनमैत्र नागा हरमा परम पवित्र : बहिरोपिसा आणि कान्होपाठक उच्चारू हे निरंतर या ॥६॥कबीर कान्हपात्र गोराकुंभार सांवता नरहरि सोनार : नामा माहदा विठा नारा नामसेटी परम भक्त साचार : जनी राजाई माता गोनाई हे जातिचि सिंपे साचार : सदा माझे देही आठवति हे न पडे तयाचा विसररे या ॥७॥नरसा मेथा आणि बाबा उदगीरीकर व्यंकटेश निंबाजी भक्त : रामदास रामभक्त रंगावा दताबा स्मरावा नित्य : सुबारण्य आणि निंबाजी हरीदास कृष्णाजी हृदयीं स्मरत । ऐसे या कलयुगी आवतरले योगी त्याचे पाई दृढ चितरे या ॥८॥कृष्णदास आणि केशवानंद सिवकल्याण या मूर्ति : शंकर गोसावि देखीयेले डोळ दासावा कल्याण कीर्ति : सीवाजी गोसावी माझा मी धाकला ज्याचा तो ध्यातसो चिति : यैसे निजभक्त हृदई माझा वाहतसे नेणो किति ॥९॥देवदास देवदत्त देवाजी देमयादत गोसावि : बापुजिबाबा वल्ली आखुबाबा आठवति माजा जीवि : सांगीतले संत गुप्त ही असति त्यासी न ( म ) स्कार भावी : आता कोण उद्धरल्या स्त्रिया त्याचि नामे परिसावी॥१०॥लक्षुमि आथ सत्यभामा आदि नारी सहस्त्राही सोळा : अहिल्या द्रौपदी सीता मंडोदरी तारा या बा उद्धरल्या : पार्वति सावित्री आरूंधति या पाविनल्या घननिळा : चुडाळ या देवाहुति पतिव्रता उद्धरल्या या सकळारे या ॥११॥वेधव्य वाटुनी दीधल सजीण घरोघरी वाण पाहीलती व तुका सेख मेहमद बनरवडी नानक यसारमा बलभदास जयराम भक्तसुद्र रामीरामदास ॥अ॥ याही वेगळे आसति शुष्टीवरी गुप्त अथवा उदास संतनामावळी बहीणीचा जप तरता न लगती सायास ॥१२॥संत बहेणाबाईचे अभंग समाप्त N/A References : N/A Last Updated : March 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP