मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|
श्री गणपती अथर्वशीर्ष

श्री गणपती अथर्वशीर्ष

This is "Ganapati Atharva Shirsh". श्री गणपतीत्यर्वशीर्ष

॥ श्रीगणपत्यथर्वशीर्षम् ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥

शांति मंत्राः

ॐ भद्रं कर्णेभिः श्रृणुयाम देवा ।

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः ।

व्यशेम देवहितं यदायुः ।

ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।

स्वस्ति नः पुषा विश्वैवेदाः ।

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः ।

स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।

अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपतये ।

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।

त्वमेव केवलं कर्तासि ।

त्वमेव केवलं धर्तासि ।

त्वमेव केवलं हर्तासि ।

त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।

त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥१॥

ऋतं वच्मि ।

सत्यं वच्मि ॥२॥

अव त्वं माम् ।

अव वक्तारम् ।

अव श्रोतारम् ।

अव दातारम् ।

अव धातारम् ।

अवानूचानमवशिष्यम्‌‍ |

अव पश्चात्तात् ।

अव पुरस्तात् ।

अवोत्तरात्तात् ।

अव दक्षिणात्तात् ।

अव चोर्ध्वात्तात् ।

अवाधरात्तात् ।

सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ॥३॥

त्वं वाङ्‌मयस्त्वं चिन्मयः ।

त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः ।

त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ।

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ।

सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥

सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।

सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।

त्वं चत्वारि वाक्पदानि ॥५॥

त्वं गुणत्रयातीतः ।

त्वं देहत्रयातीतः ।

त्वं कालत्रयातीतः ।

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ।

त्वं शक्तित्रयात्मकः ।

त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।

त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वंरुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं

वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम् ॥६॥

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् ।

अनुस्वारः परतरः ।

अर्धेन्दुलसितम् ।

तारेण ऋद्धम् ।

एतत्तव मनुस्वरूपम् ।

गकारः पूर्वरूपम् ।

अकारो मध्यमरूपम् ।

अनुस्वारःश्चान्त्यरूपम् ।

बिन्दुरूत्तररूपम् ।

नादः सन्धानम् ।

संहितासन्धिः ।

सैषागणेशविद्या ।

गणकऋषिः ।

निचृद्‌गायत्री छन्दः ।

गणपतिर्देवता ।

ॐ गं गणपतये नमः ॥७॥

एकदन्ताय विद्‌महे ।

वक्रतुण्डाय धीमहि ।

तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥८॥

एकदन्तंचतुर्हस्तंपाशमङ्कुशधारिणम् ।

रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।

रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् ।

भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।

आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् ।

एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥९॥

नमो वातप्रतये ।

नमो गणपतये ।

नमः प्रमथपतये ।

नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने

शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ॥१०॥

फलश्रुती

एतदथर्वशीर्षं योऽधीते स ब्रह्मभूयाय कल्पते ।

स सर्वतः सुखमेधते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते ।

स पंचमहापापात् प्रमुच्यते ।

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ।

प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ।

सायंप्रातः प्रयुंजानो अपापो भवति ।

सर्वत्राधीयानोऽपविघ्नोभवति ।

धर्मार्थकाममोक्षं च विन्दति ।

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् ।

यो यदि मोहाद् दास्यति स पापीयान् भवति ।

सहस्त्रावर्तनात् ।

यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् ॥११॥

अनेन गणपतिमभिषिञ्चति ।

स वाग्मी भवति ।

चतुर्थ्यामनश्वन्‌जपति ।

स विद्यावान भवति ।

इत्यथर्वणवाक्यम् ।

ब्रह्माद्यचरणं विद्यात् ।

न बिभेति कदाचनेति ॥१२॥

यो दूर्वाङ्कुरैर्यजति ।

स वैश्रवणोपमो भवति ।

यो लाजैर्यजति ।

स यशोवान् भवति ।

स मेधावान् भवति ।

यो मोदकसहस्त्रेण यजति ।

स वांछितफलमवाप्नोति ।

यः साज्यसमिद्‌भिर्यजति ।

स सर्वं लभते स सर्वं लभते ॥१३॥

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति ।

सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जपत्वा ।

सिद्धमन्त्रो भवति ।

महाविघ्नात् प्रमुच्यते ।

महादोषात प्रमुच्यते ।

महापापात् प्रमुच्यते ।

स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति ।

य एवं वेद ।

इत्युपनिषत् ॥१४॥

भाषांतर
अथर्वणऋषी गणेशाचे स्वत: अनुभविलेले स्वरुप न जगदुध्दारार्थ कथन करीत आहेत. ग्रंथारंभी मंगलाचरण करण्याचा शिष्टांचा संप्रदाय आहे. म्हणुन प्रथम  मंगलार्थ ओम्   हा शब्द उच्चारिला आहे.
*
अथर्वणऋषी म्हणतात: ब्रम्हादि स्थावरान्त देवगणांचा स्वामि अशा गणपतीला माझा नमस्कार असो. हे गणपते! तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रम्ह्तत्व आहेस. तूच एकटा या सॄष्टीचा निर्माणकर्ता आहेस. तूच एकटा या सर्व सृष्टीचे धारण करणारा आहेस. तूच एकटा या सृष्टीचा संहार करणार आहेस.
*
`सर्व खल्विदं ब्रम्ह` या श्रुतीनओ प्रतिपादिलेले सकलव्यापक ब्रम्हही तुच आहेस. तुच प्रत्यक्ष अविनाशी आत्म्स्वरुप आहेस.
*
मी यथार्थ व त्रिकालाबाधित सत्य तेच बोलत आहे.
*
*
तु माझे रक्षण कर. तुझ्या रुपाचे वर्णन करणा-या माझे रक्षण कर. तुझ्या गुणांचे श्रवण करण-या माझे रक्षण कर.
*
तुझ्या उपासनेचे दान करणा-या माझे रक्षण कर. तुझ्या उपासनेची साधने उत्पन्न करणा-या माझे रक्षण कर .
*
गुरुजवळ सांगोपांग अध्ययन करण-या माझे शिष्याचे तू रक्षण कर.
*
तुझ्या भक्तिउपासनेमध्ये उत्पन्न होणारी जी नानाविध विघ्ने त्यापासून  तू माझे पश्चिमदिशेकडून रक्षण कर.
*
तू पुर्वेकडून माझे रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर. दक्षिणेकडून रक्षण कर. वरच्या आणि खालच्या दिशांकडून माझे रक्षण कर.
*
सर्व अवांतर दिशांकडून आणि आसमंत भागाकडून तू माझे रक्षण कर!
*
तू वाणीस्वरुपी व नामरुपात्मक जीवनस्वरुपी आहेस. तू आनंदमय व ब्रह्ममय आहेस.
*
तूच सत, चित, आनंदरुपी असून `एकमेवद्वितिय असा आहेस. तू प्रत्यक्ष (ह्रुद्य़ाधिष्टित) ब्रह्मच आहेत. तू   न मय  असून विज्ञानमयही आहेस.
*
हे सर्व जगत तुझ्यापासून उत्पन्न होते, हे सर्व जगत तुझ्यामुळेच टिकून रहाते (म्हणजे स्थिती होते) आणि हे सर्व जगत तुझ्या ठिकाणीच लय पावते.
*
तसेच हे सर्व जगत तुझ्याठिकाणीच परत येते. पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही चार वाणीची स्थानेही तूच आहेस.
*
तू सत्व, रज आणि तम या त्रिगुणांपलीकडील आहेस. तू जागृती, स्वप्न व सुषुप्ति या तीन अवस्थांपलीकडील आहेस. तू स्थूल, सूक्ष्म व आनंदमय अशा तीन देहांपलीकडील आहेस.
*
तू उत्पत्ति, स्थिती, लय किंवा वर्तमान, भूत व भविष्य या तीन कालांच्या पलीकडील आहेस. तू शरीरातील मूलाधार नावाच्या चक्राच्या ठिकाणी नित्य राह्तोस.
*
तू जगताची उत्पत्ती, स्थिती व लय करणा-या ज्या त्रिविध शक्ती आहेत, तत्स्वरुपी आहेस. जीवन्मुक्त योगी निरंतर तुझे ध्यान करीत असतात.
*
तू ब्रह्मदेव (सृष्टीकर्ता), तू विष्णु (सृष्टीपालक), तू शंकर (सृष्टीसंहारक)  तू  इंद्र (त्रिभुवनैश्वर्याचा उपभोग घेणारा),  तू अग्नि (य-- मध्ये हविर्द्रव्य ग्रहण करणारा), तू वायू (सर्व जीवांना प्राण देणारा), तू सूर्य (सर्वांना प्रकाश देऊन कार्याची प्रेरणा करणारा), तू चंद्र (सर्व वनस्पतींना जीवन देणारा), तू ब्रह्म (सर्व प्राणिमात्रांतील जीवरुपी), पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार हे सर्व आहेस.
*
गण या शब्दाचा पहिला वर्ण ग् कार हा प्रथम उच्चारावा;  वर्ण म्हणजे अक्षरे, त्यातील पहिला वर्ण `अ` कार हा `ग` काराच्या पुढे उच्चारावा. त्याच्या पुढे अनुस्वार अर्धचंद्रांकित असा म्हणजे सानुनासिक उच्चारावा; तार म्हणजे प्रणव, त्याने तो एकाक्षर मंत्र उच्चारावा; हे तुझ्या मंत्राचे स्वरुप आहे.
*
याप्रमाणे सांकेतिक रीतीने मंत्रस्वरुप प्रथम सांगितले, परंतु सामान्य बुध्दीच्या लोकांना ते कळ्णार नाही, म्हणून स्वत:च पुन: अधिक सुलभतेने सांगतात -  ग्  कार हे या मंत्राचे पूर्वरुप म्हणजे पहिला वर्ण आहे. मधला वर्ण आकार आहे. शेवटचा वर्ण अनुस्वार आहे. अनुस्वारापुढे बिंदु अनुनासिक चिन्ह आहे.
*
या भिन्न भिन्न वर्णांचे संधान म्हणजे एकीकरण करणारा नाद सारखा स्वर असावा. या नाद्प्रेरिल वर्णाचा संधि- संमीलन संहितारुप एका - प्रमाणाने उच्चारण करणे असा असावा. अशा प्रकारे उच्चारलेला मंत्र ती ही गणेश विद्या आहे. म्हणजे गणेशाची प्राप्ति करुन देणारा मंत्र आहे. या मंत्राचा गणक हा ऋषी आहे. निचृद्गायत्री हा छंद आहे.गणपती ही मंत्रांची देवता आहे ( इतके सांगून पुढे ते मंत्ररुप उच्चारुन दाखविले आहे ते असे-)
*
ॐ गँ हे ते मंत्रस्वरुप आहे. ते जपून झाल्यावर शेवटी `गणपतये नम:` असे म्हणून नमस्कार करावा. (या मंत्रस्वरुपामध्ये  ग्  कार  हा ब्रह्मदेवरुपी, अकार हा विष्णुरुपी, अनुस्वार हा शिवरुपी अनुनासिक हा सूर्यरुपी व ओंकार हा शक्तिरुपी असल्यामुळे हा मंत्र म्हणजे देवतापंचायतनच आहे असे मुदगल पुराण खंड ५ मध्ये सांगितले आहे.)
* (येथे `दंति: प्रचोदयात् असे कित्येक म्हणतात. परंतु तो पाठ भाष्यानुसारी नाही. नारायणोपनिषदामध्ये तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि। तन्नो दंती: प्रचोदयात। असा मंत्र आहे. त्याचे ते अनुकरण असावे.)
*
याप्रमाणे गणेशविद्या सांगून आता गणपतीची गायत्री सांगतात - आम्ही एकदंताला (तो सर्वार्थदाता आहे असे) जाणतो व त्या वक्रतुंडाचे ध्यान करतो.  तो (ब्रह्मात्मक) दंती आम्हाला (आपल्या भक्तीची) प्रेरणा करो.
*
याप्रमाणे प्रथम नाममंत्र, पुढे एकाक्षरमंत्र, नंतर गायत्रीमंत्र असे तीन प्रकारचे मंत्र सांगुन झाल्यावर ध्यानाकरिता गणेशमुर्तीचे स्वरुप वर्णितात - ज्याला एकच (उजवा)  दात आहे; ज्याला चार हात असून त्यामध्ये वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हत्तीचा दत व उजव्या हाती वरदमुद्रा याप्रमाणे धारण केलेली आहेत; उंदीर हा ज्याचे चिन्ह (वाहन) आहे; रक्त वर्णाचा ; लंबोदर; सुपासारखे ज्याचे कान आहेत व ज्याने लाल वस्त्रे परिधान केली आहेत; रक्तचंदनाची उटी ज्याच्या अंगाला लावलेली आहे व तांबड्या फ़ुलांनी ज्याची पूजा केलेली आहे असा, आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा, सर्व जगाला लीलेने उत्पन्न करणारा व अविनाशी, सृष्टीच्या पूर्वीच प्रकट झालेला आणि प्रकृती व पुरुष यांच्याही पलीकडे असणारा अशा प्रकारच्या गणपतीचे जो निरंतर  ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी होय.
(* येथे `नम: प्रथमपतये' असा कित्येकांचा पाठ आहे व तोही समंत आहे. त्याचा अर्थ वर्णांमध्ये प्रथम ब्राह्मण आणि त्यातही प्रथम मुख्य योगी. त्या योगीजनांच्या स्वामीला नमस्कार असो.


याप्रमाणे ध्यानविधी सांगून पुढे ग्रंथसमाप्तीनिमित्त गणेशाचे नमन करतात. देवसमुदायांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. गणांच्या पतीला नमस्कार असो. शंकराचे सेवक जे प्रथम गण त्यांच्या अधिपतीला आमचा नमस्कार असो. विघ्नांचा नाश करणारा शिवपुत्र आणि वरदमूर्ती अशा गणपतीला पुन्हा पुन्हा नमस्कार असो.
*********************************
फ़लश्रुती :
*********************************
*
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन पठन करतो, तो ब्रह्मस्वरुपाला प्राप्त होतो. त्याला सर्वत्र सुखप्राप्ति होते. त्याला कोणत्याही विघ्नाची बाधा होत नाही. तो पंचमहापातकापासून (ब्रह्महत्या, सुरापान, गुरुस्त्रीगमन, सुवर्णचौर्य आणि ही करणा-यांशी संसर्ग) मुक्त होतो.
*
संध्याकाळी पठण करणारा दिवसा केलेल्या पातकांचा नाश करतो. सकाळी पठण करणारा रात्री केलेल्या पातकांचा नाश करतो. याप्रमाणे सायंकाळी आणि सकाळी पठण करणारा मनुष्य पूर्ण निष्पाप होतो. सर्वत्र पठण करणारा निर्विघ्न होतो आणि त्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांचा लाभ होतो.
*
हे अथर्वशीर्ष श्रध्दा व आदर नसलेल्या शिष्याला शिकवू नये. जर कोणी द्रव्यलोभादि मोहामुळे शिकवील तर तो अत्यंत पापी होईल. या अथर्वशीर्षाची सहस्त्र (१०००) आवर्तने केली असता, ज्या ज्या इच्छा मनात धरल्या असतील त्या त्या सर्व पूर्ण होतात.
*
या अथर्वशीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीच्या दिवशी काही न खाता, (उपोषित)  जो सर्व दिवस याचा जप करतो, तो विद्यासंपन्न होतो. असे अथर्वणऋषीचे वचन आहे. (म्हणून ते विश्वसनीय आहे.)  ब्रह्मादिकांवर मायेचे आवरण आहे ते नीट जाणावे म्हणजे केव्हांही भय वाटत नाही, तो निर्भय होतो.
*
जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा धनवान  होतो. जो.भाताच्या लाह्यांनी हवन करतो तो सर्वत्र यशस्वी आणि बुद्धिमान होतो. जो सहस्त्र मोद्कांचा अथर्वशीर्षमंत्रांची होम करतो तो आपले इष्ट फ़ल प्राप्त करुन घेतो. घृतयुक्त समिधांनी जो हवन करतो तो सर्व मिळवितो. सर्व काही मिळवितो.
*
आठ ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्त्म रीतीने शिकविले असता शिकविणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी गंगा, यमुना, गोदा, कृष्णा इत्यादि महानद्यांच्या तीरवरील अथवा महाक्षेत्रातील गणेशमूर्तीच्या सन्निध जर याचा जप केला, तर तो जप करणारा सिद्धमंत्र होतो. (मंत्रात सांगितलेल्या फ़लाची तत्काल प्राप्ति होण्याचे सामर्थ्य ज्याला प्राप्त झाले आहे तो सिद्धमंत्र म्हणावा.)
हा जपकर्ता महाविघ्नांपासून मुक्त होतो. महादोषांपासून मुक्त होतो. महापातकांपासून मुक्त होतो. (तसेच महासंकटांपासूनही  मुक्त होतो.) हे जो यथार्थ जाणतो तो सर्वज्ञानी होतो, तो सर्वज्ञानी होतो. येथे ही अथर्वणोपनिषद समाप्त झाली. (उपनिषद हा संस्कृत शब्द स्त्रीलिंगी आहे.)
*
हे अध्ययन आम्हा दोघांचे (गुरुशिष्यांचे)  बरोबर रक्षण करो, दोघांना बरोबरच उपयोगी पडो, दोघेही बरोबरच पराक्रमी होऊ या! आम्हा दोघांचे अध्ययन तेजस्वी असो. आम्ही कधीही द्वेष करणार नाही. सर्वत्र नेहमी शांती असावी.
*
हे देवहो! आम्ही कानांनी मंगल ऎकावे, डोळ्यांनी उत्तम, शुभ पहावे आणि बलवान अवयवांनी तुमची स्तुती व सेवा करीत असतांनाच देवांनी दिलेले पूर्ण आयुष्य व्यतीत करावे अशी प्रार्थना आहे.
*
महाकीर्तीमान असा इंद्र आमचे कल्याण करो. सर्वधनसंपन्न असा पूषा देव आमचे मंगल करो. तो अरिष्टनेमि असा पक्षिराज गरुड आमचे शुभ करो आणि वाणीचा अधिपती देवगुरु नेहमी आम्हाला श्रेयस् प्राप्त करुन देवो, सर्वत्र नेहमी शांतता वृद्धिंगत होवो.
(ही शांती या अथर्वशीर्षाचे पठणापूर्वी आणि शेवटी म्हणावी. सर्वत्र एकाच प्रकारचे शांतिमंत्र आढळ्त नाहीत व कित्येक तर शांति म्हणतही नाहीत, तथापि अथर्वशीर्ष हा उपनिषद मंत्र असल्यामुळे शांतिपाठ म्हणण्याची आवश्यकता आहे; म्हणून सामान्य शांतिमंत्र येथे दिले आहेत.)
याप्रमाणे श्रीगणपत्यथर्वशीर्षाचा अर्थ येथे समाप्त झाला.

Ref :
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP