मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
शहाजहानाआधीं मेली ख्यालिख...

राम गणेश गडकरी - शहाजहानाआधीं मेली ख्यालिख...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


शहाजहानाआधीं मेली ख्यालिखुशाली ती त्याची ।

खडा तेवढा ताजमहालच भूषा जी या जगताची ॥

चुकल्या तरुणा ! वेश्याक्रीडन आज तुझें स्मरणांत नसे ।

कालिदासकृत शाकुंतल परि सरस्वतीच्या कंठि असे ॥

खुनी खडयांनीं भरले रांजण वाल्ह्याचे फुटले सारे ।

उरलें रामायण तें नटवी श्रीरामा निज आधारें ॥

गोकुळांतल्या चोराचा नच गोपींना आतां त्रास ।

श्रीकृष्णाची गीता उरली द्याया मरत्या उल्हास ॥

गडगडणें, काळोख, विजा हीं गेलीं वळवाच्या मागें ।

अन्नब्रह्मची साक्ष तयाची द्याया हें राही जागें ॥

कांटे सुकले फांदीवरतीं-धन त्यांची झाली राना ।

गुलाब देवा, तुम्हां वाहिला, गोड करुनि तो कां घ्याना ॥

दूषण वगळुनि भूषणमात्रें प्रभुपूजन करि काळ असें ।

तुम्हीं आम्हीं कष्टी होणें हा कुठला मग न्याय असे ? ॥

अनुष्टुभ्‌

’गोविंदाग्रज’ अर्पी ही स्वभावें चरणांवरी ।

रसिका, घ्या फूल नाहीं फुलाची पाकळी तरी ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP