मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
थांब जरा , तारके ! जरा त...

राम गणेश गडकरी - थांब जरा , तारके ! जरा त...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


थांब जरा, तारके ! जरा तरि थांब, सखे सुंदरि !

कुणिकडे नेशी मज यापरी ?

तव किरणांच्या सुंदर कोमल आधारावरि सखे !

केलें माझें मज पारखें !

स्वर्गसुखाची आशा लावुनि ओढिसि मजला गडे !

थांबचि---सांग परी कुणिकडे ?

अति दुःखांच्या सतत अनुभवें हळवा जिव जाहला,

सुखाची सवय नाहिं त्याजला !

परि आशा लावुनि नेशी मज वरिवरी,

देशील टाकुनी स्वर्गांतुनि मज जरी,

तो अधःपातही या उन्नतिच्या परी !

उच्चतेस या योग्य न मी तरि स्वप्रेमें सांवरी,

याचना ’गोविंदाग्रज’ करी.

प्रेमें जीं कुसुमें दिलींस मजला

तूं, प्रेमले ! धाडुनी,

कोमेजून उद्यांच जातिल---सुखें

जावोत कोमेजुनी !

नाहीं वाटत खेद लेश, उलटा

आनंद वाटे मना;

प्रेमाची स्मृति त्या जिवास जडुनी

आजन्म राहील ना !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP