मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
जी दुःखी कष्टी जीवाम दुसर...

राम गणेश गडकरी - जी दुःखी कष्टी जीवाम दुसर...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


जी दुःखी कष्टी जीवाम दुसरी माता ।

वाढत्या वयांतहि लोभ जिचा नच सरता ॥

त्या निद्रादेवीच्या मी मांडीवरतीं ॥

शिर ठेउनि पडलों घ्यावया विश्रांति ॥

भोगितां या परि शांती । दिव्य ती ।

निजतात जगाचीं नातीं । जागतीं ।

जाळत्या मनाच्या वाती । लोपती ।

धडधडां भोंवतीं तोंच फटाके उडती ।

मी जागा होउनि पाहत बसलों पुढतीं ॥

तों कळे उगवला आज दिवस वर्षाचा ।

वर्षाव जगावर करीत जो हर्षाचा ॥१॥

ही जुनी दिवाळी नव्या दमानें आली ।

ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गालीं ॥

या नव्याजुन्याच्या मंगल संगमकालीं ।

जगिं आनंदीआनंद झूल जणुं घाली ॥

चहूंकडे दिवे हे; दिवेच वरतीं खालीं ।

स्वर्गीय अग्नितेजानें जगतीं न्हाली ॥

काढिलें फोल विश्‍वाचें । चाळुनी ।

या रसांत नव तेजाचें । जाळुनी ।

ढीगच्या ढीग हीणाचे । गाळुनी ।

सत्त्वाचे बावनकशीच सोनें सारें ।

ठेविलें करा रे लक्ष्मीपूजन या रे ॥२॥

ही त्रयोदशी धन पूजायाला असलें ।

काढिलें जुन्यांतुनि नवें मनीं जें ठसलें ॥

जरि घरोंघरीं नव धन हें हांसत बसलें ।

नच परवा जरि लेणें जुनेंच असलें नसलें ॥

तीं लेणीं गतकाळाचीं । सर्वही ।

टाकिते गिळुनियां साची । जणूं मही ।

उघडते नव्या खात्याची । ही वही ।

जी झरली खरली शोभा वर्षाजालीं ।

ती पुन्हा लागली ल्याया सृष्टी सगळी ॥३॥

पालवी पळाली कधींच मधुमासाची ।

धुंदीही नाहीं आतां वर्षावाची ।

तरि साधीभोळी माता देवी सरला ।

हें तत्त्व शिकविते चुकल्या मुकल्या बाळा ॥

जें जुनें फार उपयोगें । जाहलें ।

त्यांतुनी आपुल्या जोगें । जें भलें ।

रंगवा नव्या नवरंगें । चांगलें ।

प्रतिवर्ष नव्याला जन्म जुन्यांतुनि देई ।

होळींत जाळितां शिशिर, वसंतचि येई ॥४॥

अति निर्मल जलयुत श्यानपुलिन सरिता या ।

घनदाट तमांतुनि चिमणासा शशिराया ॥

जें काल पेरिलें तेव्हां वाटे गेलें ।

तें आज पिकाला आलें शतपट झालें ।

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP