मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
गाण्याचा पाहुनि जलसा मन र...

राम गणेश गडकरी - गाण्याचा पाहुनि जलसा मन र...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


गाण्याचा पाहुनि जलसा
मन रमलें नाहीं सहसा !
गोड सुरावट गायक ते,
गातां डुलती आयकते;
तालसुरांहीं ती मिळणी,
गुंगुनिया गेले कोणी;
परंतु माझें मन न वळे
कां माझें मजला न कळे !
सातसूर निसळुनि नादीं,
तानांची झाली गरदी
भिन्नत्वा येई ऊत,
नादाचें नाचें भूत !
जनसंमर्दा पहावया,
गेलों मी मज विसराया,
भिन्न देश, भाषा भिन्न
कृत्रिमेंच सृष्टी छिन्न,
कंटाळा आला पुरता,
तेथुनिही झालों सरता

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP