मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
पूर सरितेला फिरूनि फिरुनि...

राम गणेश गडकरी - पूर सरितेला फिरूनि फिरुनि...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


पूर सरितेला फिरूनि फिरुनि येत
फुटत गिरिचें पाषाणहृदय जेथ ॥
ह्रदया फुटतां हें, जरी दीनवाशी ॥
करुणरंगें रंगते “ रामवाणी” ॥१॥

पडुनि आकाशींच्याच कुर्‍हाडीचा ॥
घाव दैवाच्या सबळ तांतदीचा ॥
वंशतरुचा रोपटा कोंवळाच ॥
तोहि एकुलता तुटे आज साच ॥२॥

हिरा जीवींच्या जिवाचाच माझा ॥
गगननगरा जातसे बाळराजा ॥
शोकमंगल गावया गोड गाणीं ॥
सजे राजस रसवती “रामवाणी” ॥३॥

उचंबळुनी रस करुण येत रंगा ॥
भरुनि दुथडी वाहते ह्र्दयगंगा ॥
“रामरसवंती ” रमे काळिं ऐशा ॥
साक्ष देई श्रीमहाराष्ट्रभाषा ॥४॥

हाय !---शोकाच्या भरें काय आज ।
बोललों हें सोडुनी भीड लाज ॥
क्षमा करिं हा अपराध शब्द मातें ॥
मायभाषे ! मज मूढ बालकातें ॥५॥

कुठें देवी मंगला मायभाषा ॥
कुठें पामर मीः काय ही दुराशा ॥
थोरथोरांची मायमाउली ही ॥
बोल भलते बोललों तिला कांहीं ॥६॥

ज्ञानदेवाच्या हृदयिं बलुनि कोडें ॥
भाविकांचें जी उकलि गूढ कोडें ॥
मराठयांच्या मंडळामाजि भावें ॥
जिनें भगवद्‌गीतेस नाचवावें ॥७॥

जिच्या सामर्थ्यें सह्ज नामयातें ॥
साध्य झालें फिरविणें राउळातें ॥
एकनाथाचें देव आणि पाणी ॥
जिच्या ओघांतूनि ती हीच वाणी ॥८॥

गोकुळींच्या चोरास धरुनि पायीं ।
बसवि जात्यावर जेधवां जनाई ॥
दळण दळितां गावया गोड गाणीं
आळवी तो श्रीरंग हीच वाणी ॥९॥

फक्त नांवाची ठेउनियां ठेव ॥
करी देवाशीं सदा देवघेव ॥
अभंगांनीं ही करि अभंग वाणी ॥
खरा देहूचा जातिवंत वाणी ॥१०॥

जिनें आतांही मारितां भरारी ॥
गूढ गगनें भेदुनी पार सारीं ॥
तत्त्वरत्ना उघडिल्या दिव्य खाणी ॥
तीच कृष्णाची महाराष्ट्रवाणी ॥११॥

अशी थोरांच्या रमे हृदयधामीं ॥
बोल सलगीचे बोलिलों तिला मी ॥
मायभाषा म्हणुनीच सर्व साही ॥
बाळबोलाचा तिला राग नाहीं ॥१२॥

अजुनि खेळत माझिया मनासंगें ॥
रंगवावी मीं तशी तीहि रंगे ॥
धीर येउनि यामुळें तुला माते ॥
बोलवी मी मजसवें रडायातें ॥१३॥

हाय ! बघतां बघतांच काय झालें ॥
कुण्या जन्माचें पाप पुढें आलें ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP