मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
चल, ऊठ, कल्पने, जा बघ पाह...

राम गणेश गडकरी - चल, ऊठ, कल्पने, जा बघ पाह...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


चल, ऊठ, कल्पने, जा बघ पाहूं आज जाहलें काय
कां श्रीभारतदेवी एकाएकीच मोकली धाय ?
जी एकमात्र भूषणा पुरुषाप्रति तीहि वाङायी देवी
ठेवी कां उतरोनि स्वभूषणें ? मूकवृत्ति कां सेवी ?
सार्‍या शहर पुण्याची पुण्याई काळवंडली कां ही ?
आनंदाची माया हांसत खेळत कुठेंच कां नाहीं ?
भारतसेवामंडलसदनाभवतीं उदास वदनांनीं
अश्रूंची पुष्करिणी केली कां ? काय जाहली हानि ?
श्री फर्ग्युसन मंदिरिं शोकाचा पूर लोटला कां हा ?
हे भिंतीचे दगडहि रडुनि म्हणति सारखेच कां ? हाहा !
म्हणतात झोंप आली शिक्षा ऐकिली तरी त्वरित ज्यांस
ते धीर बाळ टिलकहि आज रडतात कां सनिःश्वास ?
हृदया ! धडधड न करीं ! ऐक इथें कोण बोललें काय ?
नश्वर देहा त्यजुनी गेले गोपाळ कृष्ण-हा ! हाय !!

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP