मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
अभिनंदन करितों प्रांजलि ।...

राम गणेश गडकरी - अभिनंदन करितों प्रांजलि ।...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


अभिनंदन करितों प्रांजलि । मंगल कालीं ॥धृ०॥

प्रजाजनांच्या मंगल वचनीं ॥ वाद्यें वाजति सकलहि भुवनीं ॥

शुभलग्नीं सुमनोहरांनीं ॥ श्रीवसुंधरा तुज वरुनी ॥ पावन झाली ॥१॥

पितामहीसम अमरसुखातें ॥ सेवि भू्वरी त्रिभुवननृपते ॥

जी शोभा दे तव जनकातें । शांत वृत्तिला त्या हातें ॥ बसवीं भालीं ॥

क्षमादयागण किरणीं रमवी । सदाहिअ भूपा वसुधा देवी ॥

जन सारे सदया करि तेवीं । तव कृपाचंद्रिकाजालीं ॥ वैभवशाली ॥


विनति नाहिं इतर कांहीं, सदाहि स्वजनकसम

तूंहि पाहिं नाटयकलानिरत जनां कृपेक्षणांहि ॥धृ०॥

कुंठित गति होति न जरि नृपकरिं ॥ ललितकला सकला ॥

भूपाल तरि तयाला ॥ द्रुततर गति वितरुनि अति पसरवि यश दशदिशांहि ॥१॥

चंद्रबिंब कांति पसरि जगभरि ॥ तिमिर जी निवारी ॥

होई न तापकारी ॥ शमधन जनिं उधळि सतत तदमृतकण निजकरांहि ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP