राम गणेश गडकरी - संगम तीन्ही काळांचा ॥ प्र...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


प्रेमकाळ
संगम तीन्ही काळांचा ॥
प्रेमकाळ घडवी साचा ॥धृ०॥

हृदयदेवते, दे हाता ॥
प्रेमकाळ निर्मूं आतां ॥
द्दढ आलिंगन दे हृदया ॥
चुंबन देई नंतर त्या-॥
एक करूं जीवा भावा ।
प्रेमकाळ चल करूं नवा ॥
प्रेमकामने । प्रेमचुंबनें ॥ जोडुं या मनें ॥
वर्तमानकाळीं करूं ती ॥ भूत-भविप्यांची भरती ॥१॥

सोहुनि सारें घरदार ॥
चिंतेचाही बाजार ॥
चुंबनेंच घेऊं नुसतीं ॥
सखे ! सारखीं; सोडुं न तीं ॥
काम एवढें मनीं धरूं ॥
जीवन चुंबनमयचि करूं ॥
आतां चुंबन । नंतर चुंबन । चुंबन जीवन ॥
इच्छा-तृप्ति क्रिया तशी ॥ चुंबनमय चल करूं अशी ॥२॥

भूतकाळची क्रिया अशी ॥
आणुं वर्तमानापाशीं ॥
वर्तमानिंची हीच क्रिया ॥
भविप्यांतही नेऊं या ॥
झाल्याचें गोडें स्मरण ॥
होत्यांचे आशा-किरण ॥
असत्याच्या या कार्यांत ॥
जिरवुनि टाकूं निमिषांत ॥
चुंबन स्मरणीं । चुंबन करणीं ॥ आशास्फुणी-॥
चुंबन एकच राहूं दे ॥ कार्यांच्या प्रेमानंदें ॥३॥

आद्यंतीं तीन्ही काळीं ॥
इच्छा तृप्ती स्मृति सगळी ॥
एकरूप होतां कुठला ॥
काळभेद सखये ! उरला ? ॥
भेद असे जो कार्यांचा ॥
भेद तोच या काळांचा ॥
इच्छा चुंबन । आशा चुंबन ॥ स्मृतिही चुंबन ॥
विलय तीनही काळांचा ॥ प्रेमकाळ निर्भेदचा ।
क्रिया एकची करूं सदा ॥
क्रिया एकची स्मरूं सदा ॥
मनांत आणूं कितीकदां ॥
क्रिया तीच, नच दुजी कदा ॥
भूतभविप्यत्कालां ॥
वर्तमान एकच सांचा ॥
हा ऐक्याचा । हा प्रेमाचा । हा जीवांचा ॥
चुंबनसंगमकाल गणा । प्रेमकाळ त्यालागिं म्हणा ॥५॥

ओंठावरतीं ओंठ सदा ॥
कदा न सोडूं इष्टपदा ॥
चुंबनास आरंभ नसे ॥
अंतहि कुठला त्यास असे ॥
चुंबन एक अनाद्यंत ॥
सखये ! मरणापर्यंत ॥
ओंठ न हाले । चुंबन असलें । सदाहि चाले ॥
नव्या जुन्याचा एक ठसा । प्रेमकाळ चल करूं असा ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-11-14T20:39:29.7600000