मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५५२१ ते ५५२२

बोधपर अभंग - ५५२१ ते ५५२२

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५५२१॥
नरक घोर तरावया । एक सांगतों उपाया ॥
करी करवी तया । साधन उपाय असे हा ॥१॥
शिवपूजा विष्णुस्मरण । गोदान हरि चिंतन ॥
गो इंद्रियें कृष्णार्पण । या नांव दान गाईचें ॥२॥
विवेक वैराग्य अनुताप । विघ्ननाशी सूर्यजप ॥
गायत्री मंत्र सुखरुप । ब्राह्मणाचा स्वधर्म ॥३॥
दानामाजी अन्नदान । श्रीरामकृष्ण कीर्तन ॥
याहुनी नसे साधन । करा भजन देवाचें ॥४॥
भवभयत्राता जगद्गुरु । त्याचे कृपें चुके अघोर ॥
तुका म्हणे अपार । करुणाकरें तारिले ॥५॥

॥५५२२॥
अनेक दु:खांची राशी । भोगितां उपाय सुटायासी ॥
नाहीं ठाव विश्रांतीसी । काय कैंची साधनें ॥१॥
अघोर असे संसार । भवसिंधु हा दुस्तर ॥
उतरावा साचार । पैल तीर लवलाहें ॥२॥
नाहीम तरी बरें नाहीं । येथें सुटि जैसें कांहीं ॥
करी काढावा जळतां पाही । फावलें घेई काढोनी ॥३॥
तांबियाची तप्त मेदिनी । यमपाश घात भडाग्नी ॥
काकचांचुतीक्षणीं । तडतडां तोडिती ॥४॥
अग्निकुंड खांब जळती । सांडसावरी तोडीती ॥
काळ नदीचा अंत । नलगेचि ॥५॥
तैलपाक विंगळाचे । श्वानवन कंटकाचें ॥
नांव नसे दयेचें । प्राणियासी जाचीतां ॥६॥

सद्गुरुनामाचें अंजन । लेउनी करावें स्मरण ॥
तुका ह्मणे तारी पूर्ण । मीत नाहीं जीवासी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP