मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४८३१ ते ४८४०

बोधपर अभंग - ४८३१ ते ४८४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


N/A॥४८३१॥
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥
डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥२॥
बहुथोडया आड । निवारितां लाभें जाड ॥३॥
तुका ह्मणे खरें । नेलें हातींचें अंधारें ॥४॥

॥४८३२॥
मुळीं नेणपण । झाला तरी अभिमान ॥१॥
वांयां जावें हेंचि खरें । केलें तेणेंचि प्रकारें ॥२॥
अराणूक नाहीं कधीं । झाली तरी भेदबुद्धि ॥३॥
अंतरली नाव । तुका ह्मणे नाहीं ठाव ॥४॥

॥४८३३॥
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें तें नका केणें भरुं ॥१॥
लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥२॥
शृंगारिलें दिसे न कळे अंतर । गोविला पदर उगवेना ॥३॥
तुका ह्मणे खोटें गुंपतां विसारें । हातिचिया खरें हातीं घ्यावें ॥४॥

॥४८३४॥
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥
पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आदरानें ॥२॥
वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥३॥
तुका ह्मणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥४॥

॥४८३५॥
बुद्धिमंदा शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥
जाय तेथें अपमान । पावे हानि थुंकी जन ॥२॥
खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥३॥
तुका ह्मणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥४॥

॥४८३६॥
पूर्वजांसीं नर्का । जाणें तें एक आइका ॥१॥
निंदा करावी चाहाडी । मनीं धरुनि आवडी ॥२॥
मात्रागमना ऐसी । जोडी पातकांची रासी ॥३॥
तुका ह्मणे वाट । कुंभपाकाची ते नीट ॥४॥

॥४८३७॥
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोन राहिलासे ॥१॥
जें जयासी रुचे तें करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥२॥
ठायीं पडिलिया तेंचि लागे खावें । ठायींचेंचि घ्यावें विचारुनि ॥३॥
बीज पेरुनियां तेंचि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥४॥
तुका ह्मणे देवा कांही बोल नाहीं । तुझां तूंचि पाहीं शत्रु सखा ॥५॥

॥४८३८॥
खोटयाचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥
काय दावायाचें काम । उगाच वाढवावा श्रम ॥२॥
परीक्षकाविण । मिरवों जातें तें हीणे ॥३॥
तुका पांयां पडे । वाद पुरे हे झगडे ॥४॥

॥४८३९॥
नयो वाचे अनिचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि ॥१॥
ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥२॥
कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥३॥
तुका ह्मणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥४॥

॥४८४०॥
ऐका जी संतजन । सादर मन करुनि ॥१॥
सकळांचें सार एक । कंटक ते त्यजावे ॥२॥
विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥४॥
तुका म्हणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP