मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग| ५१६१ ते ५१७० बोधपर अभंग ४७४४ ते ४७५० ४७५१ ते ४७६० ४७६१ ते ४७७० ४७७१ ते ४७८० ४७८१ ते ४७९० ४७९१ ते ४८०० ४८०१ ते ४८१० ४८११ ते ४८२० ४८२१ ते ४८३० ४८३१ ते ४८४० ४८४१ ते ४८५० ४८५१ ते ४८६० ४८६१ ते ४८७० ४८७१ ते ४८८० ४८८१ ते ४८९० ४८९१ ते ४९०० ४९०१ ते ४९१० ४९११ ते ४९२० ४९२१ ते ४९३० ४९३१ ते ४९४० ४९४१ ते ४९५० ४९५१ ते ४९६० ४९६१ ते ४९७० ४९७१ ते ४९८० ४९८१ ते ४९९० ४९९१ ते ५००० ५००१ ते ५०१० ५०११ ते ५०२० ५०२१ ते ५०३० ५०३१ ते ५०४० ५०४१ ते ५०५० ५०५१ ते ५०६० ५०६१ ते ५०७० ५०७१ ते ५०८० ५०८१ ते ५०९० ५०९१ ते ५१०० ५१०१ ते ५११० ५१११ ते ५१२० ५१२१ ते ५१३० ५१३१ ते ५१४० ५१४१ ते ५१५० ५१५१ ते ५१६० ५१६१ ते ५१७० ५१७१ ते ५१८० ५१८१ ते ५१९० ५१९१ ते ५२०० ५२०१ ते ५२१० ५२११ ते ५२२० ५२२१ ते ५२३० ५२३१ ते ५२४० ५२४१ ते ५२५० ५२५१ ते ५२६० ५२६१ ते ५२७० ५२७१ ते ५२८० ५२८१ ते ५२९० ५२९१ ते ५३०० ५३०१ ते ५३१० ५३११ ते ५३२० ५३२१ ते ५३३० ५३३१ ते ५३४० ५३४१ ते ५३५० ५३५१ ते ५३६० ५३६१ ते ५३७० ५३७१ ते ५३८० ५३८१ ते ५३९० ५३९१ ते ५४०० ५४०१ ते ५४१० ५४११ ते ५४२० ५४२१ ते ५४३० ५४३१ ते ५४४० ५४४१ ते ५४५० ५४६१ ते ५४७० ५४७१ ते ५४८० ५४८१ ते ५४९० ५४९१ ते ५५०० ५५०१ ते ५५१० ५५११ ते ५५२० ५५२१ ते ५५२२ बोधपर अभंग - ५१६१ ते ५१७० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत बोधपर अभंग - ५१६१ ते ५१७० Translation - भाषांतर ॥५१६१॥अंतरीं निर्मत्सर । सबाह्य कोमळ जिव्हार ॥१॥नाहीं द्वेष जया चित्तीं । समता ती सर्वा भूतीं ॥२॥निर्मळ अंतर । शुद्ध सत्वाचा आगर ॥३॥तुका ह्मणे ऐसे । ते ते विठोबासरिसे ॥४॥॥५१६२॥सत्वधीरापाशीं । राहे जतन जिवेंसी ॥१॥तरी पुण्य पडे गांठीं । उभा जवळी जगजेठी ॥२॥आवडे हे प्रीती । पाहे छळुनियां चित्तीं ॥३॥तुका ह्मणे दृढ मन । अंगीं देव तो आपण ॥४॥॥५१६३॥जिवा जिव साक्ष असे । मधें वसे अहंता ॥१॥नाडियेले ऐसे लोक । किती एक सांगावें ॥२॥वासनेची नघे तुटी । जिवा आणि करी नेटीं ॥३॥तुका ह्मणे सांडी संग । करा लाग स्मरणीं ॥४॥॥५१६४॥पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करुनियां ॥१॥शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥२॥क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥३॥कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥४॥तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥५॥॥५१६५॥बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा ॥चाविलिया आसा । काकुलती ते नाड ॥१॥हा तो गडसंदिचा ठाव । पिके पिकविला भाव ॥संकचोनि जीव । दशा केली जतन ॥२॥माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी ॥सुखाचे शेजारीं । दु:ख भ्रमें भोगितसे ॥३॥तुका ह्मणे दिशा भुली । झाल्या उफराटी चाली ॥निवाडाची बोली । अनुभवें साक्षीसी ॥४॥॥५१६६॥नष्ट त्यागुनी संगती । घात होती बहुतां ॥१॥काय मागावें कोणासी । मुख्य ऐसी स्वनिष्ठा ॥२॥संग लटिक्याचा दुरी । लाग करी चित्तानें ॥३॥तुका ह्मणे गुणी ऐसा । देव तैसा वंदितो ॥४॥॥५१६७॥स्वरुपाचे ठायीं चित्त तें बैसेना । जाणावें वासना गेली नाहीं ॥१॥काया वाचा चित्त जडे भगवंतीं । तेव्हां होय शांति वासनेची ॥२॥तुका ह्मणे रामनामाचा हो घोष । तेणें वासनेस क्षय होय ॥३॥॥५१६८॥जगीं धन्य ते माउली । मानी भ्रताराची बोली ॥१॥तिचें होतां दरुशन । मिळे पोटभरी अन्न ॥२॥नेणें व्रत उपोषण । एका भ्रतारावांचून ॥३॥पाळी अतीत अभ्यागता । जैसी बाळालागीं माता ॥४॥तिसी उपमा काय द्यावी । शिव शक्ति ते मानावी ॥५॥परपुरुष मानी पिता । तुका ह्मणे धन्य माता ॥६॥॥५१६९॥इंद्रियासी लाड देणेंचि ओंगळ । घातक केवळ परमार्थासी ॥१॥व्याघ्रासी संसर्ग सर्पासी खेळणें । इंद्रियां पाळणें तैशापरी ॥२॥म्हणोनी भल्यानें दमोनी चालावें । लोलुप्य न व्हावें इंद्रियांसी ॥३॥तुका ह्मणे धोका चौर्याशीचा घ्यावा । विषयाच्या भावा आतळीतां ॥४॥॥५१७०॥असोन सांगावें हित ब्रह्मज्ञान । तरी यां पठण उपकार ॥१॥सर्वदा जो करी सदा सावधान । परम पावन तोचि एक ॥२॥पर उपकार मानी परजनां । समान करुणा सर्वाभूतीं ॥३॥तुका ह्मणे ऐसें जो का ब्रह्मज्ञान । वदे तो सज्जन समदृष्टी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP