मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
शिवदासात्मजकृत पदें

शिवदासात्मजकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
कमलावर स्मरतां वाचे । भय वारिल कळिकाळाचें ॥ध्रुवपद.॥
शुकसनकादिक धृती जयाला । जपतां नाम जयाचें ॥कमला०॥१॥
गणिका गरुड गजेंद्र पिंगळा । स्मरतां तरले साचे ॥कमला०॥२॥
शिवदासात्मज विनवी प्राण्या । अद्भुत नाम जयाचें ॥कमला०॥३॥

पद २ रें
धांव रे हो गिरिजानाथा ! । धांव रे हो ! ॥ध्रुवपद.॥
वृषभध्वज गजचर्मविराजित । विश्वजनका ! धांव रे ! ॥धांव०॥१॥
सांब सदाशिव शंकर ईशा । स्मरतां वेगीं पाव रे ! ॥धांव०॥२॥
शिवदासात्मज नमितों या जगीं । नाहीं आनिक भाव रे ! ॥धांव०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP