मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
शुकानंदनाथतनयकृत पद

शुकानंदनाथतनयकृत पद

अनेककविकृत पदें.


तारि झडकरि आम्हा सद्गुरुराया ! ॥ध्रुवपद.॥
नसे कोणी ब्रह्मादिक बोध कराया ।
अनायासें जन्ममरण शोक हराया ॥तारि०॥१॥
भाग्यबळें पावूनीयां मानवि काया ।
केलें कांहीं सोडवेना धन सुत जाया ॥तारि०॥२॥
करि अंगिकार आतां निरसि हे माया ।
भ्रांतीपडळ जीवा भासवि वांया ॥तारि०॥३॥
अवतरलासि हरी ! तूं जन उद्धराया ।
कृपेवीण साधन नाहिं कीं कराया ॥तारि०॥४॥
शुकानंदनाथतनय म्हणे, ‘ गुरुराया ! ।
तुजवीण न जाणूं कीं अन्य उपाया. ’ ॥तारि०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP