मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| प्रेमाबाईकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... प्रेमाबाईकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी प्रेमाबाईकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें गडे हो ! कृष्ण गडी अपुला । यमुनाडोडीं बुडाला ॥ध्रुवपद.॥कालिया डसेल कृष्णाला । होइल विषबाधा हरिला ।हाका मारिल अपुल्याला । तुह्मी तरी स्वस्थपणें बसलां ।अतां कोण सोडविल रे ! त्याला ॥यमुना०॥१॥गाई त्याविण हंबरती । वासरें स्तनपान न करिती ।यापरि गोप सर्व रडती । मुखानें कृष्ण कृष्ण म्हणती ।अतां काय भेटेल अपुल्याला ॥यमुना०॥२॥यशोदा पुसेल जरि हरिला । सांगों काय तरी तिजला ? ।नंद ह्मणेल त्वां नेला । हलधर मारिल तो मजला ।अतां काय जावें गोकुळाला ॥यमुना०॥३॥दहिं दुध लोणीं म्यां हरिलें । हरीला ताक बळें दिधलें ।येइना ह्मणोनि करिं धरिलें । वृक्षा बळकट बांधीलें ।म्हणोनि तो मजवर रुसला ॥यमुना०॥४॥पेंदा धांवुनिया आला । बळकट कृष्णाला डसला ।त्याचे पाठीवरि बसला । ओझें झालें बहु त्याला ।म्हणुनि तो पळत पळत आला । भेटला प्रेमाबाईला ।गडे हो कृष्ण गडी अपुला ॥यमुना०॥५॥पद २ रें गडे हो ! कृष्ण गडी अपुला । राजा मथुरेचा झाला ॥ध्रुवपद.॥टाकुनि काळा कांबळा । कांसे पीतांबर कसला ।टाकुन मयूरपिच्छाला । जडित मुगुट घातला ।अतां काय ओळखिल अपुल्याला ॥राजा०॥१॥काढिली गुंजाची दाटी । घातला कौस्तुभ श्रीकंठीं ।टाकुनि मुरली वेताटी । हातिं घे आयुधें गोमटीं ।अतां काय बागुलभय त्याला ॥राजा०॥२॥गोधनें चारूं विसरला । आतां तो नृपामधें शिरला ।नारिनें उरीं धरुनि चुरला । अतां तो कुब्जेनें वरिला ।देतसे निजपद प्रेमेला ॥राजा०॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 18, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP