व्यंकटसुतकृत पद
अनेककविकृत पदें.
भक्ति आकळिला । कृपाघन भक्ति आकळिला ॥ध्रुवपद.॥
गोकुळीं संकटीं स्वमुखें ज्याणें । दावाग्नि गिळिला ॥कृपा०॥१॥
त्य अभीमकिनें तुलसिदलानें । गिरिधरप्रभु तुळिला ॥कृपा०॥२॥
अर्जुनरथीं सारथ्य करि हरि । निजपद दे बलिला ॥कृपा०॥३॥
द्रौपदिसंकटीं धावुनि आला । भीष्मानें पाहिला ॥कृपा०॥४॥
विदुराचे गृहीं कण्या स्वयें भक्षी । त्याला तो विकला ॥कृपा०॥५॥
व्यंकटसुत म्हणे पाहुनि डोळां । साधुचरणीं लागला ॥कृपा०॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP