दीनानाथकृत पद
अनेककविकृत पदें.
रामरसायण घ्या रे ! । तुम्ही ॥ध्रुवपद.॥
अजामिळ गणिकादि वाल्मिक । तरले याचि पथा रे ! ॥तुम्ही०॥१॥
शुकसनकादिक नारदमुनिजन । गाती याचि कथा रे ! ॥तुम्ही०॥२॥
दीनानाथप्रभु दीनदयाकर । नेईल निजपदिं बा ! रे ! ॥तुम्ही०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP