मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| निजानंदस्वामिकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... निजानंदस्वामिकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी निजानंदस्वामिकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें तें रुप पहावें गे बाइ ! पाहावें गे ! तरीच जन्मा यावें. ॥ध्रुवपद.॥चिंतिति हरि हर तें रुप नादर । अलक्ष अगोचर ।तेथें मन हें न्यावें गे बाई ! न्यावें गे ! ॥तरीच०॥१॥उलट पलट कर त्रिकुटशिखरपर ! अमृत झर झर वाहे निरंतर ।योगबळानें प्यावें गे बाइ ! प्यावें गे ! ॥तरीच०॥२॥झ्यां झ्यां झंगड बाजे अवघड । नाद भडाभडा होति कडाकड ।अनुहत त्याचें नांव गे बाई ! नांव गे ! ॥तरीच० ॥३॥निजानंदें निज आनंदें । नारायण श्रीरंगिं रंगुनी ।जावें गे बाइ ! जावें गे ! ॥तरीच०॥४॥पद २ रें सखया सजणा अंतरिंच्या सांग गोष्टी रे ! ।बहुत भाग्यें जाहाली तुझी भेटी रे ! ॥ध्रुवपद.॥भेटलासी तूं भला जिवलग गडी ।माझ्या जिवींची पुरवीं बा ! आवडी ।बोल कांहीं स्वसुखपरवडी ।जेणें नाश पावती संशयकोडी ॥सखया०॥१॥रामीं विश्व कीं विश्व असे रामीं ।जाहाल्या प्रतिती वर्तणें केंवि कर्मीं ।वर्ते प्रारब्ध तयासि कोण नेमी ? ।जीव शिव एक कीं दोन नामीं ? ॥सखया०॥२॥बोलीं तोषला बोलतां संवगडा ।तूं तंव जाणता पुसशी लोकचाडा ।सावध होउनि परियेसी पद झाडा ।भला जोडला आजि बा ! साधु जोडा ॥सखया०॥३॥पद ३ रें सखया सजणा अनुभवीं मुळिंच्या खुणा रे ! ।जाणें समुळीं त्यजोनि जाणपणा रे ! ॥ध्रुवपद.॥घटीं म्रुत्तिका, मृत्तिकेंत घट नाहीं ।पट पहातां तंतूचि सर्वदा ही ।हेमीं अलंकार तैं भेदबुद्धी नाहीं ।तैसें विश्वीं रामरूप एकचि पाहीं ॥सखया०॥१॥कर्मीं वर्तता साहजीक संस्कारें ।कदा न शिणें कर्तव्यभोगभारें ।ब्रह्मीं हूत करिं ब्रह्मार्पणद्वारें ।कर्ता कार्य कर्म जाण एकसरें ॥सखया०॥२॥ज्ञानकाळीं संचित दग्ध झालें ।अहंत्यागें क्रियमाण सर्व गेलें ।वर्ते प्रारब्ध निश्चया जना आलें ।कर्मीं वर्ते त्रिविध बोल बोले ॥सखया०॥३॥जेंवि आकाश लघुत्व घटाकाशीं ।मठीं अनेक प्रकारें पाहें त्यासी ।जीव शिव एकचि ज्ञानराशी ।भिन्न नाहीं शिवशिवा निश्चयेंसीं ॥सखया०॥४॥संवादीं या दोघांचें पुरलें कोड ।प्रीत नावरे बोलतां गोड गोड ।ब्रह्मवेत्त्या ब्रह्म्याची नाहीं भीड ।अन्य दीपिकेचि दीपासि नाहीं चाड ॥सखया०॥५॥ऐसें अंतराअंतर एक जालें ।तेथें सांगतां एकत्वें एक ठेलें ।दोघां दोनपण समुळीं हारपलें ।निजानंदीं रंगलेपणही गेलें ! ॥सखया०॥६॥पद ४ थें त्यासि भावा हो ! भावा हो ! । सांवळा सुंदर वाहे पावा हो ! ॥ध्रुवपद.॥भोग भोगोनियां भारी । ज्याला म्हणती ब्रह्मचारी ।जेथें नाहीं नरनारी । जन्मशून्य निश्चयें ॥त्यासि०॥१॥जे कां योगियांचें गुज । जे कां गुजाचेंहि गुज ।वेदगर्भींचे सहज । सुखव्याप्त स्वयंभ ॥त्यासि०॥२॥सर्वीं वसोनि सर्वातीत । नव्हे मुक्त ना अमुक्त ।निजानंदीं सदोदित । पूर्णरंगीं रंगला ॥त्यासि०॥३॥पद ५ वें येईं येईं वो श्रीरंगे ! माझे अंतरंगे ! ।करुणाकल्लोळे निजसखये ! निष्ठुर झालिस काय ? ॥ध्रुवपद.॥रविशशिविण जैशी दिनरजनी शोभा न पवे माय ! ।वांचुनि घनबिंदू क्षिरसिंधू टाकुनि चातक जाय ।मीना जळ नाहीं परि, पाहीं, दधि मधु सेविल काय ? ।तैसें तुजविण हो मज माय ! अपाय ते उपाय ॥येईं येईं०॥१॥कंठीं कृष्णमणी न विराजे, कुंकुम न वसे भाळीं ।त्याविण वधु सर्व शृंगारा लेउनि काय जाळी ? ।..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ...... ..... ।मंगळदायक ते अति हर्षें मिरवे जैशी बाळी ॥येईं येईं०॥२॥करुणा परिसोनी चिद्गगनीं, बोले मंजुळ वाणी ।‘ सखया सावध रे ! सावध रे कां करिशी हा खेद ? ।सत्ता एक जगीं विलसतसे, तुज मज कैंचा भेद ? ’ ।वियोग भंगला रंगला, अवघा निजानंद ॥येईं येईं०॥३॥पद ६ वें निजनामें आळवीलें, स्वस्वरूपीं सावध केलें ।नाहीं नाहीं चाळविलें, दिधलें सुख ॥निज०॥१॥काय तुज वानूं आम्ही, चिदात्मामाहेरा स्वामी ! ।सर्वदा मंगळधामीं, ठेविलें आम्हां ॥निज०॥२॥निजानंदें बोळवण, पूर्ण झाली पाठवण ।दृश्यादृश्य आठवण, सर्वही गेली ॥निज०॥३॥पद ७ वें सये ! कैं मनोरथ जगन्नाथ पुरवी । देउनि अभय भवसिंधु तरवी. ॥ध्रुवपद.॥लेश विश्रांतिचा प्राप्त नाहीं भवभ्रांति दिग्मंडळीं व्यर्थ फिरवी ।शीण बहु वाटतो आठवीतां पुनर्जननमरणावळि कोण सरवी ? ॥सये०॥१॥साधुसंगें अभिप्राय षट्शास्त्रिंचा सोधितां साधली युक्ति बरवी ।भक्ति वीरक्ति भगवत्प्रबोधामृतें मातली बुद्धि संकल्प नुरवी. ॥सये०॥२॥ब्रह्मसाम्राज्य स्वानंदयोगें असंभावना शांत निर्द्वंद्व करवी ।रंगला पूर्ण निजानंद जनिं मनीं सायुज्यसंप्राप्तिचें छात्र धरवी. ॥सये०॥३॥पद ८ वें अरे ! मी भक्तीचा भुकेलों रे ! । केलों तैसा झालों रे ! ॥ध्रुवपद.॥विदुराघरिंच्या पातळ कणिया । पूर्ण ब्रह्म मी सेवीं रे ! ॥अरे मी०॥१॥दुर्योधनाचे उपचारासी । न धरीं आशा पोटीं रे ! ॥अरे मी०॥२॥धांवुनि आलों द्रौपदीचिया । भाजीपानासाठीं रे ! ॥अरे मी०॥३॥पांडवजनप्रतिपाळक म्हणुनी । रक्षियलें संकटीं रे ! ॥अरे मी०॥४॥पुंडलिकाचे भक्तीसाठीं । उभा राहिलों भीमातटीं रे ! ॥अरे मी०॥५॥निजानंदें रंगलों मी । कर ठेवुनियां कटीं रे ! ॥अरे मी०॥६॥पद ९ वें ब्रह्मीं चित्तवृत्ती जडली । तेव्हा पुण्यें हीं घडलीं. ॥ध्रुवपद.॥समुद्रवलयांकित पृथ्वीचीं तीर्थें यथायोग्य घडलीं स्नानें ।सत्पात्रें पाहुन ब्राह्मणासी दिधलीं सदक्षिणा भूमिदानें ।यज्ञादिक क्रिया यथाविधि सांग करुनि श्रीहरिपूजनें ।संसारसागरापासोनि पितरां उद्धरिलें आत्मज्ञानें ॥ब्रह्मीं०॥१॥त्रिभुवनींचीं दैवतें पूजिलीं लक्ष कन्यादानें केलीं ।योगयागक्रिया तीर्थव्रततपें गोदानें जालीं ।..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ...... ..... ।दहा सहस्र वर्षे वाराणशीवास करुनियां तीर्थें आलीं ॥ब्रह्मीं०॥२॥नित्यानित्य विचार, विलोकुनि सार, मुमुक्षुदशे आला ।साधुसमागम सच्छास्त्रसंगमीं सुस्नात होउनि ठेला ।अनंतब्रह्मांडींहरिहरब्रह्मादिक पूजेसि अर्ह झाला ।सहजपूर्ण निजानंदीं रंगोनियां सहज आला न तो गेला ॥ब्रह्मीं०॥३॥पद १० वें ते मज निरवधि आवडती । भक्त महा सुगती ॥ध्रुवपद.॥दोंवरि दोन भुजा घेउनी आलों या काजा ।कीं कवळावें आंग तयांचें हृदयीं चौहातीं ॥ते मज०॥१॥ज्याच्या पादरजें सद्गती ब्रह्मांडें विरजे ।यास्तव धांवे मागें मागें चरणीं पादगती ॥ते मज०॥२॥पूर्ण निजानंदें रंगुनि छंदें नित्यानंदें ।आवडती मज हृदयीं ........ सांठवती ॥ते मज०॥३॥पद ११ वें स्मरतां नित्य हरी । मग ते माया काय करी ? ॥ध्रुवपद.॥नामरूपात्मक सर्वहि नाशक । निश्चय हा विवरीं ॥मग ते०॥१॥शांतिक्षमा परब्रह्मीं सादर । भ्रांतिभ्रमा न वरीं ॥मग ते०॥२॥सहज निजानंद रंग रंगुनी । सद्गुरुपाय धरी ॥मग ते०॥३॥पद १२ वें प्रपंच परमार्था । अंतर इतुकेंचि पार्था ! ॥ध्रुवपद.॥माती घट पट तंतू । भूषण कनक तसे जिवजंतू ॥प्रपंच०॥१॥स्थाणु पुरुष अहि दोर । शिंपीवरती रजतविकार ॥प्रपंच०॥२॥निजानंदीं नानारंग । उदकीं उठती जेंवि तरंग ॥प्रपंच०॥३॥पद १३ वें बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें. ॥ध्रुवपद.॥चित्तीं विषयाचा अभिलाष । नाहीं विश्रांतीचा लेश ।मुखें म्हणे निर्विशेष । परब्रह्म संचलें ॥बोलणें०॥१॥श्रवणीं दावी अष्टहि भाव । म्हणे मृगजळवत हें वाव ।कवडी वेंचितां हा जीव । तळमळ करी सर्वस्वें ॥बोलणें०॥२॥परोपदेशीं पूर्णज्ञानी । मोह ममता मत्सर मनीं । नागसुरें जैसा फणी । डोलें परी विष वदनीं ॥बोलणें०॥३॥शब्दें ब्रह्म कोण झालें । अन्न म्हणतां कोण धालें । शिकविलें तैसें बोले । शुकपक्षी पैं जैसा ॥बोलणें०॥४॥शिकला कळा विद्याछंद । नाहीं अंतरीं निर्द्वंद्व ।सहज पूर्ण निजानंद । सर्वरंगीं न पाहे ॥बोलणें०॥५॥पद १४ वें सदा श्रीहरिचें नाम मुखीं गात जा रे ! ॥ध्रुवपद.॥वर्णाश्रमविहित कर्म । करणें हा मुख्य धर्म ।निरहंकृति कंजनयन ध्यात जा रे ! ॥सदा०॥१॥सत्संगें शास्त्रश्रवण । श्रवणाचें करुनि मनन ।निजध्यासें पूर्ण सुखीं राहत जा रे ॥सदा०॥२॥निरतिशयें निजानंद । हाचि अहर्निशीं छंद ।अंतरंगीं तोचि जगीं पाहत जा रे ! ॥सदा०॥३॥पद १५ वें कोण पुण्यश्लोक रे ! गोकुळींचे लोक रे ! ।जयाघरीं गोपवेशें वैकुंठनायक रे ! ॥ध्रुवपद.॥कळों आली माव रे ! । भक्तीपाशीं देव रे ! ।न पाहेचि यातीकुळ, कर्ममूळ, भाव रे ! ॥कोण०॥१॥भाविकाचे बंद रे ! । तोडी जगद्वंद्य रे ! ।यशोदेनें बांधियेला, उखळीं गोविंद रे ! ॥कोण०॥२॥ज्याचा जैसा हेत रे ! । त्यासी तैसा होत रे ! ।निजानंदीं पूर्णरंगीं रंगला आनंद रे ! ॥कोण०॥३॥पद १६ वें मना ऐसा महाराज कोण आहे रे ! ।नाममात्रेचि जन्मजरा जाये रे ! ॥ध्रुवपद.॥मच्छ कच्छ पशू सूकर जाहला रे ! ।नारसिंहें अवतार धरियेला रे ! ।अंबऋषी परम सुखी केला रे ! ।अर्जुनाचा सारथी स्वयें झाला रे ! ॥मना०॥१॥धरि भक्ताचे उरीं शिरीं पाय रे ! ।पुरी नेली वैकुंठपदा पाहें रे ! ।भिल्लिणीचीं उच्छिष्ट फळें खाय रे ! ।रिसा वानरां एकांत करिताहे रे ! ॥मना०॥२॥दीनवत्सलता काय किती वानूं रे ! ।पार्थालागीं लपविला दिवसा भानू रे ! ।वृंदावनीं वाजवी रम्य वेणू रे ! ।तेणें नादें मोहिल्या गोपि धेनू रे ! ॥मना०॥३॥अनंतकोटी ब्रह्मांडें ज्याचे पोटीं रे ! ।तो हा धांवे गोवळ्या धेनू पाठी रे ! ।खांदा कांबळा घेवोनि हातीं काठी रे ! ।निजानंदें रंगला पाठीं पोटीं रे ! ॥मना०॥४॥पद १७ वें डोळा उघडेना उघडेना । पश्चात्ताप घडेना ॥ध्रुवपद.॥अहंममता करणें । नानायोनी जन्मुनि मरणें. ॥डोळा०॥१॥चिदचिद्ग्रंथि सुटेना । क्षणभरि विषयीं चित्त विटेना. ॥डोळा०॥२॥निजानंदीं रंगेना । निश्चळ निर्मळ भव भंगेना. ॥डोळा०॥३॥पद १८ वें एक मीच प्रियकर ज्याला । माझें हो आयुष्य ल्याला. ॥ध्रुवपद.॥कृष्ण म्हणे अर्जुनातें । माझें मद्भक्तांसी नातें ।जैसा मच्छ जळीं जिवनातें । जीवेंभावें न विसंबे. ॥एक०॥१॥मजवेगळें दुसरें कांहीं । त्रिभुवनिं जयासि उरलें नाहीं ।त्याविण क्षणलवपल मज पाहीं । उदास अनंत ब्रह्मांडें ॥एक०॥२॥इंद्रपदींचे जे उपभोग । त्याचे दृष्टी ते क्षयरोग ।माझें स्वरुपीं अखंड योग । वियोग नाहीं मज त्यासी ॥एक०॥३॥ऋद्धीसिद्धी मुक्ती चारी । द्वारीं वोळंगति कामारी ।देखुनि वांतीचिये परी । अखंड रत हरिगुरुभजनीं ॥एक०॥४॥कायावाचामनें चित्तें । अनन्य भावें भजती मातें ।त्याचा सर्वहि मी अच्युतें । योगक्षेम वाहावा. ॥एक०॥५॥विश्वात्म्याचे आत्मे झाले । पूर्ण निजानंदिं रंगले ।त्यासि म्हणती मेले गेले । ते भ्रांतीचे शिरोमणी. ॥एक०॥६॥पद १९ वें याचि पथें जातां भय नाहीं रे ! । निश्चय बोलती चारी साही रे ! ॥ध्रुवपद.॥राम कृष्ण शिव बोला वाचे रे ! । निंदा अपशब्द त्यागायाचे रे ! ॥याचि०॥१॥सत्कर्मजागरीं देहें जागवा रे ! । देव द्विज गुरू पदीं वागवा रे ! ॥याचि०॥२॥मानवीं संसारसार शोधा रे ! । निजानंदीं आत्मा रंगीं बोधा रे ! ॥याचि०॥३॥पद २० वें त्याचे घरा नको जाऊं । त्याचें तोंड नको पाहूं ।भेटि झाल्या सचैल स्नानावीण नको राहूं ॥ध्रुवपद.॥वेदबाह्य क्रियानष्ट परपीडक अंगें । संतुष्ट विषयसंभोगें ।निर्दय निष्ठुर काळ क्रमितो असत्संगें ॥त्याचे०॥१॥भक्ति ज्ञान विरक्तिचा लेश नसे कांहीं । संशय सर्वदाही ।मी कोण हेंचि नेणेना म्हणवी अहंदेही ॥त्याचे०॥२॥निजानंदसंगें मन न रंगेचि ज्याचें । तोंड पाहूं नको त्याचें । वर्णितां सिद्धांत भय काय त्याचे बाचें ? ॥त्याचे०॥३॥पद २१ वें भ्रमभरें भुललासि वायां रे ! सावध ।मानवी मागुती नये काया रे ! सावध ॥ध्रुवपद.॥देह, गेह, सुत, धन, जाया रे ! सावध ।जायाचीं हे सांडीं यांचि माया रे ! सावध ॥भ्रमभरें०॥१॥शिकविती निजगुज श्रुती रे ! सावध ।षड्शास्त्रश्रवणीं लागो गोडी रे ! सावध ॥भ्रमभरें०॥२॥धरीं धरीं संतसंगीं प्रीती रे ! सावध ।देहाचि या काय केली माती ? रे ! सावध ॥भ्रमभरें०॥३॥तुज करूं विनंती मी किती रे ! सावध ।तेणें रंगीं निजानंदीं जोडी रे ! सावध ॥भ्रमभरें०॥४॥पद २२ वें विरळा सज्जन तो सज्जन तो । मुनिजनमनरंजन तो ॥ध्रुवपद.॥निरहंकृति निष्कामें । ब्रह्मीं ब्रह्मार्पण सत्कर्में ॥विरळा०॥१॥शिव होउनि शिवभजनीं । अखंड तन्मय चिन्मय भुवनीं ॥विरळा०॥२॥तरोनि तारक झाला । पूर्ण निजानंदीं रंगेला ॥विरळा०॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP