मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
जगजीवनात्मजकृत पद

जगजीवनात्मजकृत पद

अनेककविकृत पदें.


नमः श्रीरामपदारविंदा । सांडून सकळ संसारधंदा ॥ध्रुवपद.॥
भाव वरा रे !  जरि दृढ तारि मानशी । रघुविर करिल दया मग काय उणें स्वसुखाशीं । मोहमाया विरून गेली अती कामासहीत साधिशी । कलुष त्वरित हरितो सकळ सेवि राघवाशी । शुकसनकादिक पवनज वाल्मिकि नारद तुंबर स्मरणीं निरंतर । कमलज शंकर सुर नर किंनर सुखघन करुणाकर । साहि शास्त्रें वेद चार मौनावले नकळे पार । क्षितिधर थकित जाला वदतां कुंठित शब्दविचार । ऐसा श्रीराघव झडकरी । भजतां हा भवभय दूर करी । जन्ममरणभय सकळ निवारी । निजजनपाळक कार्मुकधारी । जगजीवनात्मजप्रभु निजभावें वदतां चित्तीं दे निजछंदा ॥नमः०॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP