शिवदिनकेसरीकृत पदें
अनेककविकृत पदें.
पद १ लें
ज्ञानी विज्ञानी राजा ज्ञानदेव सद्गुरू माझा ।
सबाह्याभ्यंतरीं पाहुनि पूजा रे ! गडे नो ! ॥ध्रुवपद.॥
अद्वैतबोधें डोला । ज्ञानदेव ज्ञानदेव बोला ।
सांडुनियां सर्व बोला फोला रे ! गडे नो ! ॥ज्ञानी०॥१॥
शिवदिनी नाथ मनोहर । अलकापुरी वस्तीकर ।
केसरीकृपे सर्वही सौख्य करा रे ! सावध ॥ज्ञानी०॥२॥
पद २ वें
विंचू झोंबला साजणी । धांवा लवकर कोणी ॥ध्रुवपद.॥
विकळ होतसे मन माझें । घेउनि मीपणवोझें ।
चढला उतरेना अति वोंझें । धन संपतीचें माझें ॥विंचू०॥१॥
ठणका लागला विषयाचा शब्दचि बरळे वाचा ।
टाहो फुटला देहबुद्धीचा । संग षड्वैर्यांचा ॥विंचू०॥२॥
येती उतराया बहुजणी । मंत्र फुंकिती कानीं ।
तेणें उतरेना निर्वाणीं । अधिक ठणका मनीं ॥विंचू०॥३॥
गुणीं आणा गे ! लवकरी । पाणी ठेविल शिरीं ।
कर्मदृष्टीच्या जिव्हारीं । जीव शिवातीतकरी ॥विंचू०॥४॥
पहाणें पहावें तों अंतरीं । व्यापक चराचरीं ।
विंचू उतरीं तो लवकरी । शिवदीन केसरी ॥विंचू०॥५॥
पद ३ वें
माझ्या लंबोदरा सुंदरा । सरसगमनउंदिरा रे ! ॥ध्रुवपद.॥
पूर्णाचा गोड मोदक बरा । प्रेमभावें क्षीर लाडु करा !
सिद्धांत सिद्धांत वर्णित वेदांत । नित्य नैवेद्य परात्परा रे ! ॥माझ्या०॥१॥
काय वर्णूं मी पीतांबरा रे ! । सगुण तो गुणगंभिरा ।
मंगळदायक सिद्धिविनायक । सिद्धिबुद्धीच्या प्रियकरा रे ! ॥माझ्या०॥२॥
गाय वत्सा करी हंबरा । तैसा तूं भक्तिसी प्रेमभरा ।
प्रतापार्ककवेश्वरा । शिवदिन जीव अंतरा रे ! ॥माझ्या०॥३॥
पद ४ वें
म्हणजे भव तरशी भव तरशी । सुखांत फार उतरशी. ॥ध्रुवपद.॥
निर्मल चित्त करावें । विठ्ठलभजनीं प्रेम धरावें ॥म्हणजे०॥१॥
मारुनि संशय कपटी । आत्मस्वरूपीं मन हें लपटी ॥म्हणजे०॥२॥
केसरी सद्गुरुचरणीं । शिवदिन गाळी जिवपण करूनी ॥म्हणजे०॥३॥
पद ५ वें
शिवमय जग सारें जग सारें । पाहें हेंचि विचारें ॥ध्रुवपद.॥
शिवमय सकळ सृष्टी । पाहतां पाहणें एक दृष्टी ॥शिवमय०॥१॥
प्रतिबिंबात्मक छाया । तेच ब्रह्मीं जाहली माया ॥शिवमय०॥२॥
गुरु शिवदिन मी म्हणतां । आलें रामपदचि हें हाता ॥शिवमय०॥३॥
पद ६ वें
अवघें शिवमय कीं शिवमय कीं । लागुनि गेलें लय कीं. ॥ध्रुवपद.॥
द्वैत विकल्प सडला । भवींचा अनुभवशब्द बुडाला ॥अवघें०॥१॥
जिवशिव मुळपण हरला । मंगल चिदानंद हा भरला ॥अवघें०॥२॥
सबाह्य शिवसुख मुद्रा । जैसें प्रळय उदक समुद्रा ॥अवघें०॥३॥
शिवशिव शिवदिन गातां । सद्गुरु केसरि वचन आतां ॥अवघें०॥४॥
पद ७ वें
तोंवरि हळहळ रे । हळहळ रे ! । नाहीं भक्तीबळ रे ! ॥ध्रुवपद.॥
उदंड करितो कर्मे । चुकला ब्रह्मार्पण निज वर्में ॥तोंवरि०॥१॥
विवेक जागा करिना । जोंवरि शांती दृढ जीवीं धरिना ॥तोंवरि०॥२॥
सकळहि विद्या जाणे । आत्मा व्यापक जोंवरि नेणे ॥तोंवरि०॥३॥
शिवदिन केसरि पायीं । जंववरि शरण रिघाला नाहीं ॥तोंवरि०॥४॥
पद ८ वें
तो भला रे ! भला भला ।
प्रपंच साधुनि परमार्थाचा लाभ ज्याणें केला ॥ध्रुवपद.॥
मातापिता गणगोत बायको । आपण नामरूपांत ना, यको ।
श्रवणीं वेद पुराण आयको । गर्व जयाचा गेला ॥तो भला०॥१॥
संतति संपति पुष्कळ भारी । चतुर्विद्येचा कारभारी ।
परमार्थाची ध्वजा उभारी । संशय ज्याचा गेला ॥तो भला०॥२॥
अंतरिं ज्ञान विरक्ति धरितो । बाहरि सोंगसंपादणि करितो ।
जिवें जीतें मोक्षासि वरितो । भक्तिसि फार भुकेला ॥तो भला०॥३॥
भजन पूजन सत्पात्रीं जाणे । शिवदिन याविण कांहिंच नेणे ।
नादें उद्बोधार्थ सुखानें । केसरि गुरुचा चेला ॥तो भला०॥४॥
पद ९ वें
धन्य तुकोबा कीं बा ! तुकोबा कीं । तुका उतरला तुकीं ॥ध्रुवपद.॥
कीर्तनीं टाळ धरी । मागें नृत्य करितो हरी ॥धन्य०॥१॥
अभंगाचे कागद रक्षी । उदकीं देव तयाचा पक्षी ॥धन्य०॥२॥
शीतळ केलें पाणी । माजि प्रकटे चक्रपाणी ॥धन्य०॥३॥
अवस्थ देहाचि तनू । ब्रह्म झाला ज्याचा धेनू ॥धन्य०॥४॥
केसरिगुरु अवतारीं । शिवदिन श्रवणमात्रें तारी ॥धन्य०॥५॥
पद १० वें
जैसें ज्याणें केलें तैसें त्याला फळ झालें ।
ऐसें अनुभवासि आलें । यांत आमुचें काय गेलें ? ॥ध्रुवपद.॥
चोर जार रांड पोरें । निंदा द्वेषी चहाडखोरं ।
त्यांला बांधुनि यमदूतांनिं अघोर नरका नेलें ॥यांत०॥१॥
काळ व्याळ हा विक्राळ । डंखूं पाहे सर्वकाळ ।
त्याचें भय सांडुनियां मूर्खांनीं स्वहित टोलाविलें ॥यांत०॥२॥
भक्त विरक्त योगी संत । सिद्ध ज्ञानी जीवन्मुक्त ।
त्यांची सेवा करुनि देवें वैकुंठासि नेलें ॥यांत०॥३॥
अर्थ स्वार्थ साधनअर्थ । केसरि शिवदिन गुरुपरमार्थ ।
गुरुभक्तांचे गुरुभक्तीनें । जन्ममरण चुकविलें ॥यांत०॥४॥
पद ११ वें
उगाचि कां उडशी बा ! कां उडशी । आग्रहडोहीं बुडशी ॥ध्रुवपद.॥
रक्तमांस कीं हाडें । यांत सोंवळें न दिसे गाढें ॥उगाचि०॥१॥
शिरा नाडि चर्माचा । पुतळा द्वैतसंग कर्माचा ॥उगाचि०॥२॥
क्रोध काम गुण वृत्ती । विटाळ नामरूप प्रवृत्ती ॥उगाचि०॥३॥
संशय अंतरिं वागे । मीपण घातक पातक जागे ॥उगाचि०॥४॥
शिवदिन केसरिपाया । वांचुनि, दंभ सोंवळें वांयां ॥उगाचि०॥५॥
पद १२ वें
भाव धरा रे ! । आपुलासा देवा करा रे ! ॥ध्रुवपद.॥
कोणी काय म्हणो यासाठीं । बळकट प्रेम असावें गांठीं ।
निंदा स्तुतीवर लावुनि कांटी । मी तूं हरा रे ! ॥आपुला०॥१॥
सकाम साधन सर्वहि सांडा । निष्कामें मुळभजनीं भांडा ।
नाना कुतर्क वृत्तिसि दवडा । आलि जरा रे ! ॥आपुला०॥२॥
दुर्लभ नरदेहाची प्राप्ती । पुन्हा न मिळे हा कल्पांतीं ।
ऐसा विवेक जाणुनि चित्तीं । गुरुसि वरा रे ! ॥आपुला०॥३॥
केसरिनाथ गुरूचे पायीं । सृष्टि आजि बुडाली पाहीं ।
शिवदिनिं निश्चय दुसरा नाहीं । भक्त खरा रे ! ॥आपुला०॥४॥
पद १३ वें
बाइल पैशाची बा ! पैशाची । विरळागत पुरुषाची ॥ध्रुवपद.॥
धन कनकांतर गांठीं । त्याला समान सांगे गोष्टी ॥बाइल०॥१॥
नेसवि साडी लुगडीं । त्यांसीं लांवी लाडीगोडी ॥बाइल०॥२॥
भ्रतार वेडा पीसा । त्यासी नित्य करी कर्कशा ॥बाइल०॥३॥
शिवदिन गुरुचे पायीं । पैशावीण कांहींच नाहीं ॥बाइल०॥४॥
पद १४ वें
भलारे भला, पंढरिच्या पाटला विठो ! तूं धांव गड्या ! ॥ध्रुवपद.॥
मायानदी हे तरवेना । धिर कांहीं धरवेना ।
मोहें वाहावलों, उमजेना । हित कांहीं समजेना ॥
भरल्या दोन्हि थड्या । थड्या थड्या ॥पंढरिच्या०॥१॥
अहंकाराच्या लाटेनें । चुकलों मी वाटेनें ।
आतां कोण म्हणे, नेटानें । येईं या वाटेनें ॥
गवसला पानबुड्या । बुड्या बुड्या ॥पंढरिच्या०॥२॥
क्रोधें शरीर हें, व्यापीलें । मदमत्सरें दाटलें ।
भ्रमजळडोहांत, बुडविलें । ममतेसीं गोंविलें ॥
येथुनि काढिं मला । मला मला ॥पंढरिच्या०॥३॥
सुंदर गोपिका, भुलविसी । कुंजवनाप्रति नेसी ।
काळे घोंगडिला, पांघुरसी । बिदोबिदीं हिंडसी ॥
मारिसि काय उड्या । उड्या उड्या ॥पंढरिच्या०॥४॥
कोठें गुंतलासी, जेवाया । पक्कान्नें सेवाया ।
होतों मी कष्टी, देवराया । संकट उगवा, या ? ॥
खाशिल काय वड्या । वड्या वड्या ॥पंढरिच्या०॥५॥
वडजा वाकड्या, तूं येसी । चोरि कराया जासी ।
दहिं दुध घृत लोणी, तूं खासी । गोरस सकळां देसी ॥
लाविसि काय शिड्या । शिड्या शिड्या ॥पंढरिच्या०॥६॥
यमुनाजळ नेती व्रजनारी । घेउनियां घावरी ।
त्यांला गांठीसि, कंसारी । बोलसि नानापरी ॥
मारिसि काय खड्या । खड्या खड्या ॥पंढरिच्या०॥७॥
साही सावजें, बुडवीती । खोल भवार्णविं नेती ।
आशा सर्पिणी, धांवती । पायां गुंडाळिती ॥
सत्वर टाकिं उड्य़ा । उड्या उड्या ॥पंढरिच्या०॥८॥
साधू संत तुला मिरविती । वाजंत्रें वाजती ।
बहुतां प्रकारें शोभविती । चामरें ढाळिती ॥
घालिति पायघड्या । घड्या घड्या ॥पंढरिच्या०॥९॥
राईरुक्मिणीच्या सुखसदनीं । खदखद हांससि वदनीं ।
प्रेमें सुखविशी निजरजनीं । वारा वारिती विंजणी ॥
खाशिल काय विड्या । विड्या विड्या ॥पंढरिच्या०॥१०॥
अरुणभेंडिचा सांवता । आवडे तुज भगवंता ।
भाजी उपडीशी श्रीमंता । सकळ कला गुणवंता ॥
बांधिसि काय जुड्या । जुड्या जुड्या ॥पंढरिच्या०॥११॥
तुकारामाच्या शेतातें । गोफण घेउनि हातें ।
उभा राहसी माळ्यावरुतें । भवतालें पाहात ॥
उडविसी काय चिड्या । चिड्या चिड्या ॥पंढरिच्या०॥१२॥
बहिण द्रौपदी गांजिली । सभेमाजि आणिली ।
सत्वर धांवली मावली । लज्जा त्वां रक्षिली ॥
पुरविसि वस्त्र घड्या । घड्या घड्या ॥पंढरिच्या०॥१३॥
धर्मराजाच्या सदनातें । दुर्वास आला तेथें ।
घाली भोजन बहूत । धोत्रें ढिलावत ॥
लोळति गडबडां । बडां बडां ॥पंढरिच्या०॥१४॥
चोखामेळा हा तुझा भक्त । नेउनि राउळांत ।
चारी प्रहर अहोरात । सांगसि सक वृत्तांत ॥
पावसि काय गड्या । गड्या गड्या ॥पंढरिच्या०॥१५॥
एकनाथाचे भक्तीसी द्वारकेहोनि येसी
बहुताप्रकारें राबसी । गंध उगाळिसी ॥
होसील कावड्या । वड्या वड्या ॥पंढरिच्या०॥१६॥
दामाजीपंताचा महार होसी । वेदरनगरा जासी ।
रसद भरोनियां यवनासी । परतोनि पंढरि येसी ॥
अवघड काजा गड्या । गड्या गड्या ॥पंढरिच्या०॥१७॥
गुप्त केली कानुपात्रेला । अजामेळ तारिला ।
पशू गजेंद्र उद्धरिला । माझे वेळे कोठें गेला ॥
पहासि काय गड्या । गड्या गड्या ॥पंढरिच्या०॥१८॥
धामणगांविंचा बोधला । भक्तीसी गोंवला ।
त्याचे धांवसी कष्टाला । शेताचे कामाला ॥
बांधिसि काय मुड्या । मुड्या मुड्या ॥पंढरिच्या०॥१९॥
जनिच्या स्मरणें तूं धांवसी । नाना कार्यें करिसी ।
झाडिसि आंगणें उपवासी । सज्जनहृदयनिवासी ॥
घालिसि काय झड्या । झड्या झड्या ॥पंढरिच्या०॥२०॥
चिंता मनाची हरवावी । अहंकृति जिरवावी ।
आशा मनशा हे पुरवावी । भक्तिसुखें कसवावी ॥
होसिल काय पड्या । पड्या पड्या ॥पंढरिच्या०॥२१॥
शिवदिन केसरी तुज ध्यातो । अखंड वदनीं गातो ।
अक्षय भाट मी तुज बाहातों । थक्कित वाट पाहातों ॥
लवकर धांव गड्या । गड्या गड्या ॥पंढरिच्या०॥२२॥
पद १५ वें
सद्गुरु मार्तंडा मार्तंडा । विवेक झळके खंडा ॥ध्रुवपद.॥
औट हात जेजोरी । आत्मा नांदतो मल्हारी ॥सद्गुरु०॥१॥
चौदा विद्येचा भूगोळ । त्रिकुटी करीतसे गोंधळ ॥सद्गुरु०॥२॥
नव बोधाची दिवटी । तेणें चिन्मय भासे सृष्टी ॥सद्गुरु०॥३॥
ज्ञानकोट बा ! करीं । दे मज नामाची वारी ॥सद्गुरु०॥४॥
केसरिनाथ गुरु अवघा । शिवदिन म्हणे मी झालों वाघा ॥सद्गुरु०॥५॥
पद १६ वें
दैवें नरतनु सांपडली । मूढा ! तुज कां भूल पडली ? ॥ध्रुवपद.॥
अमोल्य आयुष्य जातें रे ! । कां करितोसी मातेरे ? ॥दैवें०॥१॥
मोहमदें तुम्हीं कां भुललां । काळ व्याळ गिळि तुजला ॥दैवें०॥२॥
शिवदिन सांगे मृदुवचनें । सावध होईं श्रुतिवचनें ॥दैवें०॥३॥
पद १७ वें
तोंवरि सुख नाहीं सुख नाहीं । सत्य सांगतों पाहीं ॥ध्रुवपद.॥
विषयकामना बाधीं । तेथें कैंची होय समाधी ॥तोंवरि०॥१॥
संता शरण रिघेना भावें । तोंवरि मुक्ति कधीं त्या नोहे ॥तोंवरि०॥२॥
भूतदया नाहीं ज्याला । शिवदिन काय करील तयाला ॥तोंवरि०॥३॥
पद १८ वें
इतुकें दे मजला दे मजला । मागतसें हरि ! तुजला ॥ध्रुवपद.॥
संतसमागम अर्चा । सारासार ज्ञानचर्चा ॥इतुकें०॥१॥
भगवद्भजनीं जागो । मन हें तुझ्या स्वरूपीं लागो ॥इतुकें०॥२॥
असेंचि वैभव देईं । शिवदिन केसरि गुरुचे पायीं ॥इतुकें०॥३॥
पद १९ वें
आतां मी नाहीं मी नाहीं । नरहरिवांचुनि कांहीं ॥ध्रुवपद.॥
अनुभव पाउलवाटे । जिविचें जीवन नरहरि भेटे ॥आतां०॥१॥
प्रथमच अवघा सरला । दोहीं डोळां नरहरि भरला ॥आतां०॥२॥
सच्चिद्ग्रंथ सुधारा । नरहरिविरहित काय पसारा ॥आतां०॥३॥
शिवदिन जिवपण नेलें । गुरुनें नरहरि केलें ॥आतां०॥४॥
पद २० वें
भज सीताराम मूर्ति आवडे मजला पुरती ।
नयनीं पहातां मन हें उन्मन विसरे कीजे स्फुरती ॥ध्रुवपद.॥
नवविधभक्ती नवलाभाची रामायण गुणकीर्ती ।
वाचे त्याची ध्वजा लाविली मोक्षकळसावरती ॥भज०॥१॥
चाप बाण करि ठाण चांगलें लीलानाट्कधर्ती ।
वाल्मीकादिक पतीत नामें स्मरणें हे उद्धरती ॥भज०॥२॥
लिंगदेहलंकाराक्षस किं कामक्रोध संहरती ।
महाकारणें शुद्ध सात्विकी राजा अयोध्याकीर्ती ॥भज०॥३॥
लक्षुमणाचे अनुसंधानें शिवदिन जीवपण हरती ।
केसरिभाळीं टिळा लाविला राजा चक्रवर्ती ॥भज०॥४॥
पद २१ वें
तो एक निजयोगी निजयोगी । परद्वार स्वयें भोगी ॥ ध्रुवपद.॥
अनामिका घरिं राहे । याती अविंध झाला पाहे ॥तो एक०॥१॥
गोवध ज्याला घडला । नित्य सुरापान जो प्याला ॥तो एक०॥२॥
स्त्रीहत्या ज्या घडली । शेखीं सुवर्णचोरी केली ॥तो एक०॥३॥
केसरि गुरु उद्बोध । हृदयीं नांदे परमानंद ॥तो एक०॥४॥
पद २२ वें
माझी देवपुजा देवपुजा । पाय तुझे गुरुराजा ॥ध्रुवपद.॥
गुरुचरणाची माती । तेच माझी भागिरथी ॥माझी०॥१॥
गुरुचरणाचा बिंदूं । तोचि माझा क्षीरसिंधू ॥माझी०॥२॥
गुरुचरणाचें ध्यान । तेंचि माझें संध्यास्नान ॥माझी०॥३॥
शिवदिन केसरिपायीं । सद्गुरुवांचुनि दैवत नाहीं. ॥माझी०॥४॥
पद २३ वें
तो नयनांत वसेल जेव्हां । जग गुरुब्रह्म दिसेल तेव्हां ॥ध्रुवपद.॥
प्रकृति आकृति कर्मक्रियेचा । साक्षी मुळांत वसेल जेव्हां ॥जग०॥१॥
सांगितली खुण वेदश्रुतीनें । विश्व हृदयांत ठसेल जेव्हां ॥जग०॥२॥
शिवदिन केसरी सद्गुरु साहेब । भिन्न कदापि नसेल जेव्हां ॥जग०॥३॥
पद २४ वें
मनमूषकासनिं बैसोनि यावें । क्षेम आलिंगन मजला द्यावें. ॥ध्रुवपद.॥
आणिक कांहिं न मागें तुजला । मीपण माझें विलया न्यावें ॥मन०॥१॥
एकाक्षरी बीज स्मरतां स्मरणीं । व्यापकदर्शन डोळां व्हावें ॥मन०॥२॥
केसरीनाथ गुरुपणराजा । शिवदिन दूर्वादळ शिरीं घ्यावें ॥मन०॥३॥
पद २५ वें
ह्मणजे देव तुह्मी देव तुह्मीं । सरलें अवघें तूं मी ॥ध्रुवपद.॥
प्रवृत्ति अवघी सांडा । निवृत्ति गाळुनि भजना मांडा ॥ह्मणजे०॥१॥
विसरुनि तत्वें सांडा । स्फुरण ब्रह्मांडींचें काढा ॥ह्मणजे०॥२॥
स्वात्मसुखाची खोली । समजुनि बोला निशब्द बोली ॥ह्मणजे०॥३॥
सबाह्य अंतरिं कांहीं । अनुभविं दुसरें उरलें नाहीं ॥ह्मणजे०॥४॥
शिवदिनजिवपण आळा । आज्ञा केसरि गुरुची पाळा ॥ह्मणजे०॥५॥
पद २६ वें
किन बैरीनें बइर कियो री । साजनकू बहिराग दियो री ॥ध्रुवपद.॥
पेहरी जो मुद्रा भस्म चढायो । कानमो कुंडल अलख जगायो ॥किन०॥१॥
खांदे जो पावरि हातमो झोली । गल बिच निर्गुन माला सैली ॥किन०॥२॥
शिवदिन मनोहर केसरि प्यारा । अलख खलख सब जोति उजारा ॥किन०॥३॥
पद २७ वें
किसीका कोन संगाती । बाबा ॥ध्रुवपद.॥
अकेलाही आवे अकेलाही जावे । हात हुजुरकी पाती ॥बाबा०॥१॥
तन मन धन जो गर्बहि मतकर । कहत पुरानकी पोथी ॥बाबा०॥२॥
मात तात जोरू लटका घर । होय मसानकि माती ॥बाबा०॥३॥
शिवदिनके प्रभु केसरि साहेब । देख दिलभर साथी ॥बाबा०॥४॥
पद २८ वें
सोई कच्चा बे कच्चा बे । नही गुरुका बच्चा ॥ध्रुवपद.॥
दुनिया तजकर खाक लगाई जाकर बैठा बनमो ।
खेचरि मुद्रा इंद्रियनिग्रह ध्यान धरत है मनमो ॥सोई०॥१॥
कुंदलियाको खूब चढावे ब्रह्मरंध्रको ल्यावे ।
चलता है पानीके ऊपर जो बोले सो होवे ॥सोई०॥२॥
गुप्त होकर परगट होवे मथुरा गोकुलवासी ।
प्राणनिकार सिद्ध जो होवे सत्यलोकका बासी ॥सोई०॥३॥
वेदशास्त्रमें कछू नही रहा पूर्ण ज्ञानको पाया ।
बेदविधीका मार्ग चलके तनका लकडा किया ॥सोई०॥४॥
शिवदिनके प्रभु केसरि साहिब करनी कथनी रहनी ।
आपहिमध्ये आपको चीन्हे वोही है गुरुज्ञानी ॥सोई०॥५॥
पद २९ वें
आदेस कहनाजी कहनाजी । आदिपुरुष लखनाजी ॥ध्रुवपद.॥
सिरपर टोपी कानोंमे कुंडल गले रुद्राक्षमाला ।
तिलक भालपर चंद्रकोर है श्यामसुंदरका टिकला ॥आदेस०॥१॥
सेली सिंनी पुंगी तुंबी और बभूतको गोला ।
अनुहत किन्नर नाद सुनावे अलख निरंजन भोला ॥आदेस०॥२॥
बैरागोंका लिया लंगोटा पंथ चलावे उलटा ।
तत्त्वबोधका प्याला पावे गगनमगनमें लपटा ॥आदेस०॥३॥
निरगुन केसरिनाथ कृपाघन शिवदिन हरिका साई ।
घटमट नितबित प्रकाश गेहे रामकर दिखावे वाही ॥आदेस०॥४॥
पद ३० वें
दो दिन तुम भलाई कर रे ! । अखर तेरी मरमर रे ! ॥ध्रुवपद.॥
सुपनासी जिंजगानी जानी । दौलत झूटी भरभर रे ! ॥दो दिन०॥१॥
आतमग्यान बिन मुगत न कोई । जमका पेट डरडर रे ! ॥दो दिन०॥२॥
कुटुंबकबीला साथ न जावे । छांड बुराई करकर रे ! ॥दो दिन०॥३॥
शिवदिन प्रभुको साहेबके । चरन सुभाव धरधर रे ! ॥दो दिन०॥४॥
पद ३१ वें
रंडी दुर करना दुर करना । ध्यान गुरूका रखना ॥ध्रुवपद.॥
जबलग हातमे हुवेगा रुका । तबलग रंडि कहे मेरा सका ॥रंडी०॥१॥
रंडी प्रीति लगावे खाशी । आखर दिलावेगि फांशी ॥रंडी०॥२॥
शिवदिन केसरि प्यारे । कामिककुं पैजार रंडी मारे ॥रंडी०॥३॥
पद ३२ वें
हम फकीर जनमके उदारी निरंजनवासी ॥ध्रुवपद.॥
सत्तकि भिछा दे मेरे माई मनका आटा भरपूर ।
बारबार हम नहि आनेके हरदम हार खुसी ॥हम फकीर०॥१॥
सोना रूपा अधेला पैसा ओं कुच हम ना चाहे ।
प्रेमकि भिछा लाव मेरे माई हम पंची परदेसी ॥हम फकीर०॥२॥
सीरफोड जलाली करते मगन हार वो न्यारे ।
शिवदिनके प्रभू केसरिसाहेब चरनोके रहिवासी ॥हम फकीर०॥३॥
पद ३३ वें
मन रे ! नारायन साथि करना । किस खातर डरना ॥ध्रुवपद.॥
बिकट संकटसें भाग छुपाई । आजब नरदेही ।
सोही काळनें आदी खाई । गाफल क्यौं रे ! भाई ॥मन रे!०॥१॥
आवई हुईसो खबरधर । मेरा मई दुरकर ।
झुटी माया सों न्यारा होकर । दुसतर भवजल तरना ॥मन रे!०॥२॥
साच सबदमो केसरि सारा । शिवदिनका प्यारा ।
नयनो भरपुर देखन सारा । दिनरईन उजाला ॥मन रे !०॥३॥
पद ३४ वें
हजरत अल्ला । सबदुनियापालनवाला ॥ध्रुवपद.॥
जिसका असमान है एक तंबू । धरती जाजम, पवना खंबू ।
उपर गाडा है गंबू । हरदम अल्ला ॥सब०॥१॥
चंद्र सूरज दोनो चिराखी । नव दरवाजे दसवी खिडकी ।
उप्पर रखि है एक फिरकी । सब घट अल्ला ॥सब०॥२॥
सात समुंदर खंदक खोली । मोहबतका दरवाजा मोली ।
अबोल बोलत मीठी बोली । सबरस अल्ला ॥सब०॥३॥
साई केसरि गुरु पिरसारा । शिवदिन नाम मुरीद हि तारा ।
झगमग जागत ज्योत हिजारा । लाल हिलाला ॥सब०॥४॥
पद ३५ वें
आल्लख जागे । गुरुजी आल्लख जागे ॥ध्रुवपद.॥
उलट्पालटमोद अर्सन गाढा । रूपरेखबिन पुरूख ठाडा ।
चंद्रसुरजबिन तेज उघाडा । कर्मशून्यका मूल उघाडा ॥आल्लख०॥१॥
समाधिलागीं सहजासहजी । अनुहत सिंगी बाजत बाजा ।
उन्मनिसंगें सो मन रीझ्या । जाहा ताहा नहि आपबिन दुजा ॥आल्लख०॥२॥
चतुर्दल षडदल दशदल उलटा । द्वादशदल षोडशदल फांटा ।
द्विदलपर किया चपेटा । तब सहस्रदल भौरा पैठा ॥आल्लख०॥३॥
अजरामर पद केसरि गुरुका । पाया शिवदिन आदि अंतका ।
अमृत पीया अर्धचंद्रका । धोका नहि अब जनममरनका ॥आल्लख०॥४॥
पद ३६ वें
यारो पेट बडा बांका । सबसे लगा दिया ठोका ॥ध्रुवपद.॥
देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे टूका ।
एक आसनपर क्या बैठेगा पीछे काळ डंका ॥यारो०॥१॥
ईस पेठसें चार छिनाला ईस पेटसें पैदा ।
ईस पेठसें ढोंग धतूरा किया पेटने पैदा ॥यारो०॥२॥
ईस पेटसें राव शिपाई राजा परजा मरते ।
ईस पेटसें अमीरउमराव मुलुक मुलुकपर फिरते ॥यारो०॥३॥
शिवदिन कहे मन जग बैठे नही पेटसें न्यारे ।
गरिबबिरे पसू पछि सोई सबही पेटने घेरे ॥यारो०॥४॥
पद ३७ वें
जडाव कोंदनका कोंदनका । बनाव सच्चिद्धनका ॥ध्रुवपद.॥
लाल सफेत वर काला । उपर चमके उन्मनि बाला ॥जडाव०॥१॥
निगा लगी आलखमो । झगमग झनत्कार झलकमो ॥जडाव०॥२॥
केसरि गुरु कांचनमो । शिवदिन जडा गया कोंदनमो ॥जडाव०॥३॥
पद ३८ वें
बाबा ! उमर गमाई रे ! । भाई भगति न पाई रे ! ॥ध्रुवपद.॥
झुटी संगत कछु नहि बाबा ! । साहेब साथी करना ।
जैसा आना वैसा जाना । नही दीन पछाना ॥बाबा!०॥१॥
चांद सुरज और तारे झळकें । बिजली भाव बतावे ।
ठोक न नेमे चूक पडी तब काया खाक मिलावे ॥बाबा!०॥२॥
मातापिता जोरू लरके सबही झूटा खेला ।
नैनन आरसा देख दिवाने कर साहेब सो मेहेरा ॥बाबा!०॥३॥
दिलका आइना दिलमे देख सब घट जात जगावे ।
साहेब केसरिनाथ जगावे नारायन सों भावे ॥बाबा!०॥४॥
पद ३९ वें
उसपर बल जैये बल जैये । प्रेम प्रीतिसें रहिये ॥ध्रुवपद.॥
अलखपलखमो सारा । सब घट देखे साई हमारा ॥उस०॥१॥
अजपाजप करता है । कर बिन मन मनका फिरता है ॥उस०॥२॥
आसक केसरि घरका । शिवदिन बंदा उसके घरका ॥उस०॥३॥
पद ४० वें
सो येक धन मेरी । धन मेरी निर्गुनसागरलहरी. ॥ध्रुवपद.॥
भोजनके जब माता । जैसी लोभ करे निजपूता ॥सो०॥१॥
सेज पलंगपर सोवे । जैसी रंभा होके भावे ॥सो०॥२॥
नीच कामपर दासी । नेमधर्मकुं नहि उदाई ॥सो०॥३॥
केशरी गुरुकी चेली । शिवदिन जेर आवे गाली ॥सो०॥४॥
पद ४१ वें
उसपर वारि जाऊ रे ! उनके पायां लागूं रे ! ॥ध्रुवपद.॥
नव दरबाजे दसवी खिरकी । ऊपर है येक फिरकी ।
बिरला साधो कोई एक जाने । लेकर मनकी गिरकी ॥उस०॥१॥
दोनों नयन उलटे मारूं । सब घट मेरे सांई ।
निंदा स्तुति कछु नहि जाने । वोही लाल गुसांई ॥उस०॥२॥
शिवदिनके प्रभु केसरि साहेब । अगमनिगमका राजा ।
अनुहत डंका निसदिन बाजे । बाजत तनका बाजा ॥उस०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2017
TOP