मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
गोपालात्मजकृत पदें

गोपालात्मजकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
सुचना तुज किति रे ! करुं गा हरि ! वारंवार ॥ध्रुवपद.॥
करुणाकर तो न दुजा पतीतपावन ज्याचें नाम ।
अनन्य मतीनें गातां ध्यातां कृपा करिल तो राम ॥सुचना०॥१॥
जो जगदांतरीं तो तुज अंतरिं पाहें करीं विचार ।
पापताप संहरितो नामेम करितो जगदुद्धार ॥सुचना०॥२॥
गोपालात्मज सुखदा भक्ति प्रेमाचा ग्राहीक ।
मूढमना हे ! किति शिकवूं तुज अजुन तरी आईक ॥सुचना०॥३॥

पद २ रें
संसारकळिसंतरणोपाय राम कृष्ण गाईं ॥ध्रुवपद.॥
वेदशास्त्रीं हा निश्चय । नामापरता न उपाय ।
प्रेमें नाम स्मरतां भय । कळिकाळाचें नसेही ॥संसार०॥१॥
मनबुद्धि जडतां नामीं । वृत्ती होत्ये अंतर्गामी ।
प्रीति उपजे स्वात्मकामीं । कामबुद्धि निरसुनी ॥संसार०॥२॥
नाम घेतां माया तुटे । दृढतरचि जडग्रंथि सुटे ।
नरत्वाचि भ्रांती फिटे । स्वयेंचि नारायण होय ॥संसार०॥३॥
नाम प्रताप शंकर जाणे । प्रर्‍हादादिक मुक्त जेणें ।
गोपालात्मज भयभयभेणें । हरिनामाकृत सेवितों ॥संसार०॥४॥

पद ३ रें
दावा प्रियकर गोविंद मला बाई ! ।
कोठें गेला गे ! सांग लवलाहीं ॥ध्रुवपद.॥
सवें वत्सें घेउन येईल हरी । मार्ग लक्षीत उभी माडिवरी ।
पंचरत्नाची आरती करीं । ओवाळुनी नेइन स्वमंदिरीं ॥दावा०॥१॥
छपरपलंगीं पुष्पाची शेज केली । सभोंवार लाविल्या दिपावळी ।
सुगंधाच्या रेखिल्या रंगवेली । अझुन नये कां निसी प्रहर जाली ॥दावा०॥२॥
वाट पाहतां नेत्रासी आला भार । कामअग्नी पेटला अनिवार ।
रमाधवाविण जळो संसार । विरहशोकें मूर्छित क्षोणिवर ॥दावा०॥३॥
शुद्ध राधेचा पाहोनियां भाव । भक्तकैवारी आला देवराव ।
उचलोनि राधिके दिली खेंव । गोपालात्मज मागतो चरणीं ठाव ॥दावा०॥४॥

पद ४ थे
हरिवरि दृढ निश्चय असल्यानें । देइल सुख घरीं बसल्यानें ॥ध्रुवपद.॥
अंगबळें तरि श्रमचि साचे रणांत वनांत घुसल्यानें ॥देइल०॥१॥
हरि करुनी विन शीण हरिना देवावर कसे कसल्यानें ॥देइल०॥२॥
गोपालात्मज सुखद श्रीहरिचा तत्वबोध मनिं ठसल्यानें ॥देइल०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP