शुकानंदकृत पदें
अनेककविकृत पदें.
पद १ लें
उदासीन पाहतां दिशा दाही । सखा भेटेना काय करूं बाई ? ! ॥ध्रुवपद.॥
वृत्ति साक्षी फिरोनि जंव पाहे । तेथें नाना येउनि उभी राहे ॥उदा०॥१॥
काय तप मी कीं जपव्रतें करूं । कोण्या पुण्यें भेटेल मज गुरु ॥उदा०॥२॥
भेटिसाठीं तळमळ वाटे चित्ता । शुकानंदा मज कोण दाविं आतां ॥उदा०॥३॥
पद २ रें
भवसागर तारुं । कधिं भेटेल माझा गुरु ? ॥ध्रुवपद.॥
तापत्रयें संतप्त मी झालों । कोण करिल परिहारु ? ॥भव०॥१॥
कामक्रोधादिक ओढोनी नेती । कोणापुढें हाका मारूं ॥भव०॥२॥
कृपादृष्टीनें शांतविं माते । शुकानंद कल्पतरू ॥भव०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP