गिरिधरकविकृत पदे
अनेककविकृत पदें.
पद १ लें
दाशरथी नवरा । तो माने ॥ध्रुवपद.॥
पारखिले नृप वोंगळ सारे । अंतरिं राम बरा ॥तो माने०॥१॥
मानसमोहन सुंदर बाई ! । मानवला नवरा ॥तो माने०॥२॥
गिरिधरप्रभु कल्पतरु सांडुनि । कोण पुजी हिंवरा ॥तो माने०॥३॥
पद २ रें
काळघुसायमदूत ।रावण॥ध्रुवपद.॥
लांब मिशांचा निबर दाढा । दिसतो भांबडभूत ॥रावण०॥१॥
दशमुख दर्पमदोन्मत्त मेला । दुर्मद मत्त बहूत ॥रावण०॥२॥
गिरिधर म्हणे धनु केवळ ज्याचा । गर्व नगा पुरहूत (?) ॥रावण०॥३॥
पद ३ रें
त्र्यंबक त्रिपुरारी ! येवढें विघ्न निवारी ॥ध्रुवपद.॥
मेरूसम शत भारी होउनि कार्मुक नुचलो यातें ।
शंभु शिव शशिमौळी इतकें उचित द्यावें मातें ॥त्र्यंबक०॥१॥
गिरिधर प्रभुतें हो साहकारी गिरिजेसह ये ये काळीं ।
लंकापति अपमानुनि कीजे दशही वदनें काळीं ॥त्र्यंबक०॥२॥
पद ४ थें
प्रधान आला राजांजवळी । कां हो तुम्ही उठा ना ? ।
वेगीं योजा चापा । वरील हा सीता ॥ध्रुवपद.॥
चातुर्थिक ज्वर अमुची पाळी । ........................ ।
कासाविस बहु उरात झाली । निसत्व बसली कानटाळी ॥कां हो०॥१॥
पोटशुळाची व्यथा फार । आंगीं आम्हां फणफणित ज्वर ।
आज आमुचा घातक वार । न करा आम्हां बलात्कार ॥कां हो०॥२॥
र्गो दमाच्या येती धापा । दंडवत तुमच्या शिवचापा ।
आमुचें काम नव्हे रे बापा ! । शक्ति जयातें उठतिल आपा ॥कां हो०॥३॥
भाग लवेना भरला बाई ! । त्याहुनि आमुचा माज सवाई ।
आमची आज भोवतसे डोई । न ठरे आमुचा पाय भाई ! ॥कां हो०॥४॥
लचक भरली आमुचे हाता । नलगे आह्मां तुमची सीता ।
आम्हीं ते मानियली माता । गिरिधर म्हणे त्या नृपखद्योता ॥कां हो०॥५॥
पद ५ वें
कां पाहसी वेड्यावाणी । विजयी झाला राम ॥ध्रुवपद.॥
ऋषि बोलती सभेसी । नाचती उडती त्या सभेसी ।
झडकरि म्हणती रावणासी । ............................... ॥विजयी०॥१॥
तुझा तूंची होसी भाट । वदसी पुरुषार्थाचा थाट ।
वानिसि मीपणा अचाट । कार्मुक बसलेम बोकांडीं ॥विजयी०॥२॥
दाढ्या मिशा भुजा वीस । त्या तुज करिती कासावीस ।
ऐसें चाप हें खवीस । केलें दुखंड क्षणमात्रें ॥विजयी०॥३॥
गिरिधर स्वामिया भोगोळी (?) । बळियामाजी महाबळी ।
विजयी झाला जिंकुनि फळी । वरिली जनकाची कन्या ॥विजयी०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP