मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| गोपाळनाथकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... गोपाळनाथकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी गोपाळनाथकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें रामा ! तुजला कारभार फार । माझा असो तुजला आठव रे ! ॥ध्रुवपद.॥अनंत ब्रह्मांडें एक्या रोमीं । अनंत कुटुंब सार रे ! ॥रामा०॥१॥साधुधर्मरक्षण अवतरणें । करिसी दुष्टसंहार रे ! ॥रामा०॥२॥गोपाळात्मा सुख पद लक्षी । नमितों वारंवार रे ! ॥रामा०॥३॥पद २ रें अजुनि नये रघुराणा । तो सजलजलदतनु जाणा ॥ध्रुवपद.॥मनबुद्धिवाचे पर ज्याचा पार न शास्त्रपुराआण ।तो अजराजतनय सुत झाला कौसल्येचा तान्हा ॥अजुनि०॥१॥बाळलीला अनुजांसह दावितो चाप लघु बाणा ।करीं धरुनि संधान भेदि जो मानुनि ( मांडुनि? ) सुंदर ठाणा ॥अजुनि०॥२॥आत्माराम एक अनेकीं रविप्रतिबिंबें नाना ।घटमठ महदाकाश तसा गोपाळ सकळ घटिं जाणा ॥अजुनि०॥३॥पद ३ रें साजणि ! त्वरितगति जा तूं । तया सांगे मम प्रणिपात् ॥ध्रुवपद.॥जीविंचें गुज मी सांगतसें तुज, प्रगट न करिं हे मातु ।बलाधिश आनकदुंदुभिसुत आणि धरुनियां हातु ॥साजणी०॥१॥नूपुर अतिवाचाळ अशाला त्यागुनि होय निवांतु ।संगतिवर्जित भेट तयाला लक्षुनियां एकांतु ॥साजणी०॥२॥ओतप्रोत पटतंतून्यायें आत्माराम जना तूं ।मथुराधिश जो उग्रसेन गोपाळ तयाचा नातू ॥साजणी०॥३॥पद ४ थें दासी झाल्यें मी श्रीगुरुची । काया वाचा त्या निजघरची ॥ध्रुवपद.॥भक्ति साडी नेसविली मज । अनुभव सोनसळी भरजरिची ॥दासी०॥१॥शांति दया विरक्ती असे जी । लेणीं लेववी मज बहुपरिचीं ॥दासी०॥२॥आत्माराम धनी मजला तो । गोपाळक छाया करि करींची ॥दासी०॥३॥पद ५ वें कुंजवनीं मधुर ध्वनि गाजे । मनमोहक मुरली बरि वाजे ॥ध्रुवपद.॥संश्रुति स्मृति विस्मृति मनिं ऐकुनि । वेधियेलें सखिये ! मन माझें ॥कुंज०॥१॥धाम काम मज न सुचे कांहीं । झालीं पिसी, त्यजी लौकिक लाजे ॥कुंज०॥२॥आत्मारामीं वृत्ति हरिली । गोपाळक चालक यदुराजे ॥कुंज०॥३॥पद ६ वें हे तनु जाणा रे ! जाइ जिणें जाणा रे ! ॥ध्रुवपद.॥साची पंचभूतांची, यांची संगत श्रम देणार ।भरी भरूं नको, जीविं धरूं नको, मनीं करुनि विचार ॥हे तनु०॥१॥कर्मवशें संगम क्षणभंगुर गोठली जळगार ।भरीं भरूं नको, मनीं चळूं नको, हे नव्हे नव्हे साचार ॥हे तनु०॥२॥अलक्ष तनु करीं, धरिं निजलक्षीं, पावशि साक्षात्कार ।समान जनांत वनांत व्यापक मनांत तूंचि विचार ॥हे तनु०॥३॥गोपाळात्मा सुखद समजुनि बुध झाले तदाकार ।किति तुज सांगूं स्वरुपीं जागूं वागूं वारंवार ॥हे तनु०॥४॥पद ७ वें सद्गुरुरायें नवल केलें आज ।माझ्या मनाचें उन्मन झालें सहज ॥ध्रुवपद.॥सहजीं सहज देखिलें आजि डोळां ।चहूंकडे भरला हरि सांवळा ॥सद्गुरु०॥१॥भरला उरला बोलतां नये वाचे ।मागें पुढें घनदाट अवघा सांचे ॥सद्गुरु०॥२॥साचचि परि तें द्यावया नये हातीं ।ऐसें समजोनी ते योगी गर्क होती ॥सद्गुरु०॥३॥गर्क परी अखंड अनुसंधानीं ।निमिषोनिमिषीं पहती प्रीति करुनी ॥सद्गुरु०॥४॥प्रीति जडली नाथ गोपाळासी ।उन्मनि संग निःसंग स्वानंदासी ॥सद्गुरु०॥५॥पद ८ वें साजणी ग ! मंगल दसरा आम्हांसी झाला बाई ! ॥ध्रुवपद.॥अक्षय घटाची स्थापना । चिन्मय चित्पदीं दीप जाणा ।सुमनमाळा लावुनि घना । निजबिज पेरियलें ठायीं ॥साजणी०॥१॥नवविध भक्ति ते नव दिवस । दशमी अद्वय तो निज कळस ।सीमा उल्लंघुनि या दशदिशा । वाजवि अनुहत निज घायीं ॥साजणी०॥२॥आत्मा कांचन घेउनि सुरा । विकल्प मेंढा मारुनि पुरा ।परतुनि आलों मुळिंच्या घरा । विजयी झालों गुरुपायीं ॥साजणी०॥३॥अंबर फाडुनि चिदंबर ल्यालों । अंबरस्वारी करुनी आलों ।निजपदरूप होउनि ठेलों । ओवाळित उन्मनी आई ॥साजणी०॥४॥अखंड ब्रह्मानंदीं सोहळा । सद्गुरु गोपाळनाथ भोळा ।जो कीं निजबोधा आगळा । वेदपुराणीं श्रुति गाई ॥साजणी०॥५॥पद ९ वें आधीं मन मुंडा बा ! मन मुंडा । मग तुम्ही ब्रह्मचि धुंडा. ॥ध्रुवपद.॥मनचि हातीं नाहीं । तेह्तें ब्रह्म करिल कायी ? ॥आधीं०॥१॥मनचि मुंडलें नाहीं । तेथें सद्गुरु करील कायी ? ॥आधीं०॥२॥गोपाळनाथ सांगतो सोई । लागा तुम्ही सद्गुरुपायीं ? ॥आधीं०॥३॥पद १० वें वैद्यें गुण केला बा ! गुण केला । संशय अवघा हरला. ॥ध्रुवपद.॥भवरोगाचा झाडा । आत्मप्रचीति देऊनि पुढां ॥वैद्यें०॥१॥तळमल जीवपणाची भारी । औषध देउनि केली दूरी ॥वैद्यें०॥२॥शांतिसुखाचें पथ्य । मन मारुनि केलें हित ॥वैद्यें०॥३॥गोपाळनाथ म्हणे मी रोगी । सद्गुरु वैद्य मिळाला वेगीं ॥वैद्यें०॥४॥पद ११ वें कोण धन्यला मना करी रे ! । मना मानलें तेंचि करी. ॥ध्रुवपद.॥वाटिदुधास्तव दे उपमन्या । क्षीरसागर बक्षीस करीं ॥कोण०॥१॥मुष्टिपृथुस्तव दिधलि दयाळें । सुदामजिस सोन्याची पुरी ॥कोण०॥२॥वर्तमान रावण लंकेचा । बिभीषणा अभिषेक करी ॥कोण०॥३॥धणि गोपाळ उदार दयाघन । भावें विरोध्या मुक्त करी ॥कोण०॥४॥लावणी १ लींवदति गोपिका बरी हरीला आवडली कुब्जा ।अतिवृद्धा वक्रा सरिज्ञवशी (?) दुसरी अब्जा ॥ध्रुवपद.॥मान चळचळा कांपे नव्वद वर्षे गेलिं तिजला ।सुकलें मांस त्वचा सुरकुत्या अती देह झिजला ।निबर दोडकें तेंवि रोडकें तिशीं काय रिझला ।गोकुळिंच्या सुंदर वनितांचा वृंद कसा त्यजिला ॥चाल ॥ गे ! कल्पलता सांदुनी जसा धतुरा ।कीं चिंतामनि टाकुनी घेत गारा ।कीं मलयागिरि टाकुनी काष्टभारा ॥उठाव ॥ तेच परी सखयांनो ! आम्हां झाली गाढ लज्जा ।तुलशीच्या भोक्त्या कासया असावी सबज्या ॥वदति०॥१॥एक म्हणे तो अक्रूरनामा क्रूर असा दिसला ।ठकुनि सांवळा नेला परि हा नंद कसा फसला ।कृष्णेंही मन कठिण करुनियां त्वरित रथीं बसला ।जाउन दासी ओंगळवाणी तिचे सदनिं घुसला ॥चाल ॥ गे ! नवल कसें सये बाई ! ये परिसा ।तें लोह जसें स्पर्शतांच त्या परिसा ।पालटेल रंग त्याच्या संगासरिसा ॥उठाव ॥ तद्वत घडलें नेणों तीणें काय पुजिलीं शिवगिरिजा ।जाली भामिनी प्रेमें प्रियकरा मोरमुकुटशिर जा ॥वदति०॥२॥दुजी म्हणे तीणें सांवळा भावें अर्चियला ।सुमन मालती, सुगंध शीतल चंदन चर्चियला ।भक्तिभुकेला परम तियेच्या भावाशीं भुलला ।अनंतजन्मार्जित सुकृतें दैवयोग घडला ॥चाल ॥ गे ! रिद्धिसिद्धि कामार तिच्या दाशी ।गे ! केंवि म्हणों ये तिजलागुनि दाशी ।प्रियपात्र जीचे सच्चित्सुखराशी ॥उठाव ॥ समजुनियां मनिं पुरतें आतां टाकुनि द्या गमजा ।विश्वीं आत्माराम तोचि गोपाळ असें समजा ॥वदति०॥३॥पद १२ वें कर विचार मन रे ! तूं क्या करे गुमान ।दो दिनके मेजवान आखर जायगा निदान ॥ध्रुवपद.॥क्या साथ लाया ! लेजायगा नही ।आया आकेला जब जायगा तुही ॥कर०॥१॥भाइ बहिन लडके तुज काम न आवेंगे ।बांध मारे जमके दूत तुजको न छुडावेंगे ॥कर०॥२॥करसवदा सुकृतका तुज काम आवेगा ।रामनाम भज भवनदी पार पावेगा ॥कर०॥३॥जग बिच आत्माराम बिहरि है कृपाल ।साधुसंग बुझले भरपूर है गोपाल ॥कर०॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 17, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP