मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
रामकविकृत पदें

रामकविकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
पुरे नाम संसृती तराया, कशासी जपतप फार रे ! ॥ध्रुवपद.॥
रा म्हणतां पाप क्षय होउनी । मकारासि उच्चार रे ! ॥पुरे०॥१॥
उफराट्या उच्चारें जाला । वाल्मिकिचा उद्धार रे ! ॥पुरे०॥२॥
श्वपचादिक हे वदतां होती । रामरूपनिर्धार रे ! ॥पुरे०॥३॥

पद २ रें
श्रीरघुवीर त्यागुनि काय केलें रे ! ॥ध्रुवपद.॥
सुंदर नरतनु अनंत कुत्सित - । संगें मोहुनि मज(न?) रमवीलें ॥श्री०॥१॥
असंत दुर्जन अधमसमागम । रिझुनि रिझुनि हित बुडवीले ॥श्री०॥२॥
ब्रह्म शुकादिक भजनीं रमले । मंदमती यौवनें भुलवीले ॥श्री०॥३॥
रामराय प्रभु शार्दूल सोडुनि । दुष्ट दुर्मद जंबुक धरियेले ॥श्री०॥४॥

पद ३ रें
करुणावरुणालयास राघवास गा रे ! ॥ध्रुवपद.॥
राघवबोलें पावन केलें । गणिकेतें सहज बोलतां, खगा रे ! ॥क०॥१॥
ललनापोरें घातुकि चोरें । भुलवीती जेंवि पारधि मृगा रे ! ॥क०॥२॥
धर्माधर्म न कळुनि वर्म । आचरितां कर्म पावसी दगा रे ! ॥क०॥३॥
रामावांचुनि देहिं वांचुनी । व्यर्थचि वांचुनियां पुस्तका ढिगा रे ॥क०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP