श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ३

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


पहा तुर्येचे वरुतें । भ्रमरगुफेचे खालते ।

समरुपान सरते पुरते । चहुंकडे ॥३॥

टीका

पहातां तुर्येचे वरुते । भ्रमरगुंफेचे खालते । समरुप ठाकलें तें । आत्मरुप ॥१॥

गगनाचा जालीया ग्रास । जाय पहाणे पण लयास । नामरुप गुणाभास । उरला कोठें ॥२॥

प्रथम वायु सर्व घन । तेथ जे लहरी निर्माण । तेणें जालें पोकळपण । गगन ते ॥३॥

वारिया पोटीं गगन । सगुणा दावी जें निर्गुण । ज्याचें नि तुणारु सगुण । विश्वलहरी ॥४॥

ऐसीया वरियाची सिद्धी । पावोनि महाभक्ता समाधी । वस्तुचिया होवोनि धुंदी । आनंदमग्न ॥५॥

वारें झणकार करी । रामनाम जयजयकारी । सांडोनि वाचाया चत्वरी । समाचि जाले ॥६॥

हरीवांचें हरीचा गजर । पहात चालिला अहोरात्र । यथा तुरियेचे वर । समाचि वस्तु ॥७॥

रुप तेंचि जालें नाम । नाम तेंचि स्वरुपब्रह्मा । नामीं संचले अनाम । नामीं कैंचे ॥८॥

रामनाम सर्वागाळे । न ये आकाशाही मेळे । आकाशिया पैल आतळे । साधकासी ॥९॥

येथोनि आतुडे ही वाट श्रीगुरुकृपें अवचट । नामीं स्वरुप घनदाट । समाचि जालें ।\१०॥

समनामीं समाचि वस्तु । जेथ नुरे पाहे द्वैतु । जरी कां प्रसन्न सग्दुरुनाथु । प्रचित ये ॥११॥

श्रोत्रवाणी चक्षु पैल । नाम पाहातां सोज्वळ । जेथ उपाधी चंचळ । विलया गेली ॥१२॥

जेथ पानोहे विषम । ते तो अवघेचि सम । जे कां आगम निगम । दावीचना ॥१३॥

चहु शुन्येंअ समचि जालीं । तेथिची विषमता निमाली । एक वस्तुचि व्यापिली । अनादी जे ॥१४॥

चारी शुन्याचा विस्तार । तेचि अखिल चराचर । एकतत्त्व परात्पर । होवोनि ठेले ॥१५॥

एक नाम ते श्रीहरि । आदिअंती पहाले कुसरी । द्वैत नाम पाहातां दुरी । दुगवले ॥१६॥

जीवशिवासी जो सभा । म्हणोनि तो हरी आत्मा जेथ सकळही विषमा । लाही जाली ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP