श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ६

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अजपजपाचेनि छंदे । अनुहताचेनि नादें ।

त्रन्नवींचेंक निजंछंदें । स्वरुप देखाघें तुर्येवेळें ॥६॥

टीका

अखंड जप चाले देही । म्हणोनि ते अजपा होई । जपावेगळी परी कांहीं । नोहेचि जेथें ॥१॥

सुर्यापाशीं दिनरात । बोलणें काय हें तेथ । जन्मकरण किमर्थ । अमृतपाशीं ॥२॥

अखंड जालीयां तें सुख । बोलावें काय सुखः दुःख । आत्मरुप जेथ एक । मी तुं काय म्हणावे ॥३॥

शब्द जालीया परिपुर्ण । दाविता नये शब्दप्रमाण । बिंदु जालीया परिपुर्ण । उपाधि कोठें ॥४॥

तेचि जाली येथपरी । जप चालिला अहोरात्रीं । म्हणोनियां कोणीतरी । अजपा नाम ठेविलें ॥५॥

एकविसहजारसहाशें प्रमाण । चाले दिनरातीं श्वासांचे श्ववन । तितुकें अखंड चाले स्मरण । आजपाते ॥६॥

कायीं व्यर्थ जाय नाम । तयासी जपतां पुर्ण काम । अजप जप तो उत्तम । बोलिलसे ॥७॥

लुब्धालिया अजपा छंदे । रंगला अनुहताचेनिसांदें । जरि कां नाम नादें । मेळविले ॥८॥

डोळिथ डोळा मिळवुन । जरी कां वाणीरुप श्रवण । जालें एकचि जीवन । एकसरा ॥९॥

येणें रीति नामछंद । साधितांची हा गोविंद । प्रगट अनहुतनाद । श्रवणपुटी ॥१०॥

अनुहातघंटाश्रवणी । श्रवणाकार जीवन नयनीं । प्राणकळा गगनांतुनी । श्रवणीं आली ॥११॥

नयनाकार श्रवणवाणी । प्राणकळाही जेथुनी । ओघरती निशिदिनी । नाद तेथें ॥१२॥

सोहं चक्रां छेडतां तंत । धारणेचा तणावा येत । सोहंतार नाद देत । मंद्रघोर ॥१३॥

महाशब्द शब्दी आला । तो नादे घुमोनि ठेला । तेथें निजछंद लागला । सत्रावीचा ॥१४॥

सोळाबाराची मिळणी । रामकृष्ण ओविले मणी । तयाचिये एकपणीं । सत्रावी वाहे ॥१५॥

सत्रावी ते जीवनकळां । ऊर्ध्व अमृतओघ गेला । आकाशीयां लागता डोळा । स्वरुप दिठी ॥१६॥

रामकृष्णीं स्वरुप ठसा । पुर वोंसंडें गगनासा । सारोनि सकळही दृश्या । एतुलिया ॥१७॥

आतां एकचि स्वरुप । जेथ आटले पुण्यपाप । गगनातु अग्निस्वरुप । पतिप्रभा ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP