विराठाचें नाभीकमळीं । सेवटी हे सहदस्त्रळीं ।
सोहं नादे लागली टाळी । योगिराजा ॥१२॥
टीकाः
सोहमस्मि नाद गहन । अनुवृत्तिचा वाहे पवन । गगनी जें सांठले गगन । प्रस्फुटपणें ॥१॥
तया नादे जीवनकळीं । विराठाचें नाभिकमळीं । महाशुन्यातु झळाळी । सहस्त्रदळा ॥२॥
जेथ पुर्णात्मदर्शन । जीवांचे सरलें जीवपण । तेचि जाले अनुसंधान । अखंडत्वें ॥३॥
तेचि परिपुर्ण अखंड । अणुमात्र नोहेचि खंड । स्वरुप उजाळलें प्रचंड । सहस्त्रदळीं ॥४॥
भाव आटले रामकृष्ण । तेचि पाहाता जीवपणा । आत्मस्वरुप गहन । प्रत्यया आलें ॥५॥
तेथेंचि लागली टाळी । जे कां नामेंचि उटाळी । द्वयाद्वयासी जे टाळी । काय सांगोम ॥६॥
धन्य धन्य ऐसा योगी । आत्मस्वरुपासी जो भोगी । राहोनियां सर्व संगी । असंग जो ॥७॥
उदकी जैसें कमलपत्र । तैंसे मन ज्याचें विचित्र । असोनियां इच्छातंत्र । सकळापैल ॥८॥
स्वयेचि स्वतः सिद्ध जाला । ऐसा योग सर्वागळा । ज्ञानईनें साध्य केला । गुरुकृपें ॥९॥
धन्य धन्य ज्ञानदेव । स्वयेचि जाले देव देव । म्हणोनि नवलाव अपुर्व । देखियेला ॥१०॥
सांगितली अनुभवगोठी । सर्वावरी प्रेमदृष्टी । प्रेमाप्रेमाची पडतां मिठी । कळे गुज \।११॥