श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २२

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


देह नगरांतुनि आहे आट । चिदाचक्राच चढोनि घाट ।

सहस्त्रदळीं समाधि अचाट । भोगिती योगी ॥२२॥

टीकाः

देहनगरीं इयें वाट । त्रिकुट श्रीहाट गोल्हाट । पुढें पहातां औटपीठ । भ्रमरगुंफा ॥१॥

पुढें पहातां ब्रह्मारंघ्र । चिदाचक्र तयावर । घाट कठिण साचार । उल्लंघाया ॥२॥

जो कराया उल्लंघन । करणे लागे प्राणार्पण । सोहं अनुवृत्ति गहन । तद्गत प्राण ॥३॥

ऐसि करोनि प्राणार्पण । हारपे जिवांचे जीवपणा । रामकृष्णगाति गहन । वृथा मीपण नयेचि ॥४॥

पैल सहस्त्र दआळ निघोट । तेथ समाधि अचाट । घनानंद घनदाट । एकसरा ॥५॥

समाधि ते समाधान । केवळ बुद्धिगम्य गहन । पहातां हें विज्ञान खुण । अरुती टेली ॥६॥

बोलतां चालतां देखतीं । तैसेचि श्रवनपुटी पहातां । जे पां अढळचि सर्वथा । इयें संधी ॥७॥

येथ जें कां अवधि । तेथ साधिली हे संधि । इया सहजसाधनसिद्धि । समाधि जोडे ॥८॥

सहजसमाधि सहजासन । जयांचे सहज साधन । ऐसा योगिराज आपण । समाधि भोगी ॥९॥

सहस्त्रदळी समाधि अचाट । ज्ञानराज भोगिती चोरवट । जे स्वयेचि घनदाट । स्वरुप जाले ॥१०॥

शब्दगति चक्षुनाद । श्याममाझारी अभेद । जे कां असे स्वयंसिद्ध । समाधिरुपें ॥११॥

तेचि समाधि साधिली । जे कां सकळां श्रेष्ठ जाली । सोहंरुपाचियें मेळीं । सहस्त्रदळीं ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP