श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २३

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


सहस्त्रदळीचे शेवटी । पैल तुर्येचे पाठी ।

चिन्मय मोती दिठी । दिसताहे ॥२३॥

टीकाः

औटपीठपैल पाठी । आत्माचि भरे केवल दृष्टी । साक्षात्कार हा संपुटी । नयनाचिये ॥१॥

समत्वची जाली पुष्टी । जरि कां रामकृष्णीया दिठी । तरी सहस्त्रदळीं शेवटी । चिन्मय मोती दिसताहे ॥२॥

चिन्मय जे मुक्त स्थिती । तेचि बोलिले चिन्मयमोती । चिन्द्रुप ते पहातां गति । शुन्याआतु ॥३॥

शुन्याआतु रामकृष्ण । तेचि चिद्रुप सगुण । तयापैल ते निर्गुण । सहस्त्रदळीं ॥४॥

सहस्रदळीया सद्रुप । चिन्मय जे निर्विकल्प । सतं बोलिले मुक्तरुप उघडपणें ॥५॥

परिपुर्ण स्वतः सिद्ध । नित्यत्वेकं शुद्ध बुद्ध । पहातं तेजाळ अगाध । निरुपाधिक ॥६॥

साक्षात्कार इये दिठी । पहातांचि पडे मिठी । दाटे आल्हाद दृष्टीपुटीं । एकसर ॥७॥

ऐसे ज्ञानराजा जालें प्रेम । प्रेमासी मिळालें । अंतरीचें अंतरीं फावलें । गुरुचे गुज ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP